Valentine Day : व्हॅलेंटाईनला मावळच्या गुलाबाचा बहर; ८० लाख फुलांची परदेशात निर्यात; गुलाब निर्यातीत मावळ राज्यात प्रथम

Maval News : जगभरात साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन निमित्ताने गुलाबाचे फुल, गिफ्ट दिले जात असते. यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांची मागणी वाढते मावळमधून मोठ्या प्रमाणात गुलाबाची निर्यात
Valentine Day
Valentine DaySaam tv
Published On

मावळ : 'व्हॅलेंटाईन डे' म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी गुलाबाच्या फुलाची मागणी अधिक होत असते. याच अनुषंगाने मावळ तालुक्यातून परदेशात गेल्या एक महिन्यात ८० लाख गुलाब फुलांची निर्यात झाली असून एका फुलाला चौदा ते सोळा रुपये भाव मिळाला. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त परदेशी गुलाब फुले निर्यात करणारा मावळ पहिला क्रमांकावर राहिला आहे. 

व्हॅलेंटाईन डे म्हटला म्हणजे तरुणाईमध्ये उत्साह संचारलेला असतो. प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस दोन दिवसांवर आलेला आहे. जगभरात साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन निमित्ताने गुलाबाचे फुल, गिफ्ट दिले जात असते. यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांची मागणी वाढत असते. यामुळे मावळमधून मोठ्या प्रमाणात गुलाबाची निर्यात करण्यात येत असते. मागील महिनाभरापासून निर्यात केली जात आहे. 

Valentine Day
Sangli DCC Bank : साडेपाच हजार मृत कर्जदाराच्या वारसांना नोटीसा; सांगली जिल्हा बँकेकडून आतापर्यंत ७० लाख वसुली

जपान, युरोपात निर्यात 

मावळातील गुलाब फुले हॉलंड, ब्रिटन, दुबई, सिंगापूर, जपान, सह युरोपातील देशात निर्यात केली जातात. मावळचा गुलाब हा प्रदेशात मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यामुळे जगभरातील प्रेमी मावळ मधील गुलाबाच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते. यावर्षी परदेशात ४२ सेंटीमीटरच्या गुलाबाला अकरा रुपये, ५२ सेंटीमीटरच्या गुलाबला पंधरा रुपये, तर ६२ सेंटीमीटरच्या गुलाबाला १६ रुपये असा भाव मिळाला आहे. यावर्षी मावळात करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मावळातील शेतकरी आनंदीत आहे. 

Valentine Day
Hingoli News : सीसीआयकडून कापूस खरेदी बंद; शेतकऱ्यांच्या गाड्या खरेदी केंद्रावर थांबल्या

वातावरणामुळे झाला परिणाम 

गेल्या दीड महिन्यापासून तापमानातील चढ-उतार व ढगाळ हवामानामुळे गुलाब फुल शेतीवर विपरीत परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. त्यामुळे फूलशेतीवर याचा विपरीत परिणाम झाला होता. गुलाब फुले निर्यातीचा कालावधी सुरू होण्यापूर्वीच दहा दिवस फुले उमलण्यास सुरुवात झाल्याने काही उत्पादकांना ती स्थानिक बाजारपेठेत कमी भावात विकावी लागली होती. हवामानातील चढ उतारामुळे आठ ते दहा दिवस लवकर सुरुवात झाल्याने मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात गुलाब फुले उत्पादकांची तारांबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com