MD Drugs Case : एमडी ड्रग्स प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; मुंबई, गुजरात कनेक्शनचे धागेदोरे

Sambhajinagar News : कंपनीतून मेडिकल वेस्ट पावडर खानच्या गोदामात येत होती. तेथून खान परराज्यातील ड्रग्ज तस्करांकडे पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय
MD Drugs Case
MD Drugs CaseSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात सापडलेल्या एमडी ड्रग्ज आढळून आले आहे. पोलिसांनी छापेमारी करत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणी करण्यात आलेल्या तपासार एमडी ड्रग्स तस्करीचे मुंबई व गुजरात कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यामुळे यात मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी मधील गोडाउनवर छापेमारी करत एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. यात एका फार्मा कंपनीतील भंगाराचे कंत्राट घेतलेल्या मुख्य आरोपी बबन खान याला त्याच्या दोन मुलांसह वाहन चालक आणि इतर एक आरोपी अशा पाच आरोपींना अटक केली आहे. कंपनीतून मेडिकल वेस्ट पावडर खानच्या गोदामात येत होती. तेथून खान परराज्यातील ड्रग्ज तस्करांकडे पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 

MD Drugs Case
Brahmagiri Hills : ब्रह्मगिरीवरून अचानक दगड कोसळले; नवविवाहित दाम्पत्य थोडक्यात बचावले. तिघेजण जखमी

१ कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त 

दरम्यान या कारवाईमुळे पुन्हा एकदा ड्रग्जचे मुंबई, गुजरात कनेक्शन समोर आले आहे. फार्मा कंपन्यांमधून कचऱ्यात निघणाऱ्या गोळ्यांच्या पावडरपासून एमडी ड्रग्जचा धंदा करणाऱ्या खानसह त्याच्या दोन मुलांना आणि दोन चालकांना एनडीपीएसच्या पथकाने साजापूर चौफुली रस्त्यावरील गोदामात छापा मारून अटक केली. या कारवाईत २ किलो ४७३ ग्रॅम एमडी पावडर, दोन टेम्पो असा १ कोटी ४३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

MD Drugs Case
Nashik Tourism : नाशिक जिल्ह्यातील पर्यटनासाठी नवे नियम लागू; पर्यटन स्थळांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

पाचही जणांना २९ पर्यंत पोलीस कोठडी 

सदर एमडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी बबन खान नजीर खान यांच्यासह त्याची दोन मुले कलीम खान बबन खान, सलीम खान बबन खान, वाहन चालक शफीफुल रहेमान तफज्जूल हुसेन आणि राज रामतिरथ अजुरे या पाच आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com