Marathwada University
Marathwada UniversitySaam tv

Sambhajinagar News : हातात लाठ्या काठ्या, तलवार घेऊन विद्यापीठात प्रवेश; मराठवाडा विद्यापीठातील प्रकार

Sambhajinagar News : गेल्या २-३ दिवसांपूर्वीच विद्यापीठांमध्ये काही तरुणांनी प्रवेश करून विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता
Published on

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बजरंग दल संघटनेचे काही तरुण घुसले. (Sabhajinagar) हातामध्ये लाठ्या काठ्या आणि  तलवार घेऊन तोंडाला रुमाल बांधत अचानक प्रवेश केला आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असताना अशा पद्धतीने प्रवेश कसा केला? हा प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहे.  (Latest Marathi News)

Marathwada University
Hingoli News : कत्तलीसाठी बैलांना कोंबून नेणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त

छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Marathwada University) बजरंग दलाचे काही कार्यकर्ते हातात काठ्या व तलवार घेऊन घुसले. मात्र परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देत धूम ठोकली. गेल्या २-३ दिवसांपूर्वीच विद्यापीठांमध्ये काही तरुणांनी प्रवेश करून विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर प्रवेशद्वारावर (CCTV) सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेला होता.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Marathwada University
Wardha News : महावितरणच्या कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत कामबंद; मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सुरक्षा वाऱ्यावर 

मात्र आज विद्यापीठामध्ये सुरक्षारक्षक असताना हे हुल्लडबाज तरुण नेमकी कुठून घुसले? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यामुळे अजूनही विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावरच आहे; असं स्पष्ट दिसून येते. दरम्यान बजरंग दलाचे हे हुल्लडबाज तरूण आज व्हॅलेंटाईन डे असल्याच्या निमित्ताने काही प्रेमी युगलांवर हल्ल्याच्या उद्देशाने आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com