Maharashtra Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर प्रशासन सज्ज; २१ कक्षांची स्थापना

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्या अनुषंगाने संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 News
Maharashtra Lok Sabha Election 2024 NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency News:

लोकसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असुन निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने नियोजन केले आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २१ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. (Chhatrapati Sambhajinagar) त्यांच्या मदतीला प्रत्येकी पाच जणांचा समावेश आहे. 

Maharashtra Lok Sabha Election 2024 News
Latur Crime News : शेतीच्या वाटणीवरून मुलाने केला आईचा खून

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) येऊ घातली आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्या अनुषंगाने संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच प्रशासनाने कक्ष स्थापन केले आहेत. सोबतच मतदान केंद्रावर उन्हाळा असल्याकारणाने पिण्यासाठी पाणी ग्लुकोज आणि डॉक्टरांचे एक पथक तैनात असणार आहे. लहान मुलांना पाळणाघर देखील असणार आहे. आज कार्यालयात निवडणुका अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. (Election) निवडणुका आज झाली तरी सज्ज असल्याची अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Breaking Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Lok Sabha Election 2024 News
Kalyan News : दोन मोबाईल चोरटे पोलिसांच्या ताब्यात; सव्वा लाखांचे आठ मोबाईल जप्त

२१ कक्षा स्थापन 

कक्षांसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करत कामे नेमून देण्यात आली आहेत. निवडणूक निर्णय कक्ष, आचारसंहिता कक्ष, मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्ष, अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण कक्ष, निवडणूक साहित्य वितरण, वाहतूक व्यवस्था, संगणक कक्षात एसएमएस व कम्युनिकेशन प्लॅन कक्ष, स्विप कार्यक्रम कक्ष, कायदा व सुव्यवस्था सुरक्षा व्यवस्था कक्ष, उमेदवार, राजकीय पक्षांचे निवडणुकीशी संबंधित खर्चाची माहिती व नियंत्रणासाठी कक्ष, माध्यम कक्ष, मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष, मतपत्रिका, डमी मतपत्रिका आणि टपाली मतपत्रिका कक्ष, संपर्क कक्ष, मतदार यादी आणि मतमोजणीपर्यंतच्या सर्व समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com