Chatrapati Sambhajinagar News : जलवाहिनी फुटली; संभाजीनगर शहरात पाणी बाणी, अनेक भागांमध्ये १२ दिवसांपासून पुरवठाच नाही

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळवाडीजवळ रस्त्याचे काम चालू असताना पुन्हा जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली.
Chatrapati Sambhajinagar News
Chatrapati Sambhajinagar NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरावरील पाणी टंचाईचे विघ्न कायम आहे. एकीकडे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक भागांमध्ये १२ दिवसांपासून पाणी पुरवठा नाही. तर दुसरीकडे (Sambhajinagar) शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी कुठेनाकुठे फुटत असल्याने पाण्याची नासाडी होत आहे. (Breaking Marathi News)

Chatrapati Sambhajinagar News
Shirur Crime : शेजारील घराला कुलूप लावून टाकला दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळवाडीजवळ रस्त्याचे काम चालू असताना पुन्हा जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. परिणामी जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणी पुरवठ्याचे (Water Scarcity) वेळापत्रक पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ येणारं आहे. काही भागांत तर १० ते १२ दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने नागरिकांवर पाणी बाणी करण्याची वेळ आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chatrapati Sambhajinagar News
Latur News : बांधकाम कामगारांच्या गृहउपयोगी वस्तू वाटपात झोल; पैसे घेऊन दलालांकडून किटचे होतेय वाटप

गेल्या पंधरा दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी दररोज कुठे ना कुठे फुटत आहे. छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जर फुटली, तर या संबंधितावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. यावरती प्रशासन गुन्हे दाखल करणार का? असा प्रश्न सर्वांना उपस्थित झाला आहे. मात्र ही पाईप लाईन फुटली असल्याने या ठिकाणी जवळपास कमरेपर्यंत पाणी रस्त्यावरती  ठीकठिकाणी साचलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com