Latur News
Latur NewsSaam tv

Latur News : बांधकाम कामगारांच्या गृहउपयोगी वस्तू वाटपात झोल; पैसे घेऊन दलालांकडून किटचे होतेय वाटप

Latur News : बांधकाम कामगार मंडळाच्या वतीनं लातूर जिल्ह्यात गृहउपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यास सुरुवात झाली होती. मात्र यात अनेक बोगस व्यक्तींनी दलालामार्फत पैसे देऊन सदरचे किट पळवल्यचा आरोप यावेळी करण्यात आला
Published on

संदीप भोसले 

लातूर : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने गृह उपयोगी वस्तू वाटप केले जाते. मात्र या साहित्य वाटपात मोठा भ्रष्टाचार (Latur) होत असल्याचे समोर आले आहे. अज्ञातस्थळी पैसे घेऊन वस्तूंचे किट वाटप केले जात असून यात नोंदणीकृत बांधकाम कामगार वंचित असल्याचे वास्तव पाहण्यास मिळाले. (Maharashtra News)

Latur News
Shirur Crime : शेजारील घराला कुलूप लावून टाकला दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

बांधकाम कामगार मंडळाच्या वतीनं लातूर जिल्ह्यात गृहउपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यास सुरुवात झाली होती. मात्र यात अनेक बोगस व्यक्तींनी दलालामार्फत पैसे देऊन सदरचे किट पळवल्यचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. साधारण एक किटसाठी तब्बल एक हजार रुपयाची मागणी एजंट करत केल्याचा आरोप (MNS) मनसेच्या जिल्हा मनसेच्या कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. दरम्यान लातूरमध्ये साधारण २५ हजार नोंदणीकृत कामगार आहेत. मात्र यामध्ये अनेक बोगस बांधकाम कामगार म्हणून नोंद केलेल्या कामगारांची मोठी संख्या आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Latur News
Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ; शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस, बीडमध्ये ९ गुन्हे दाखल

दुसरीकडे शासनाने जाहीर केलेली कामगारांसाठीची मोफत गृह उपयोगी वस्तू वाटपाची योजना आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. जर पैसे घेताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; अशी माहिती लातूर येथील कामगार सहाय्यक आयुक्त यांनी दिली. मात्र सर्रासपणे अज्ञातस्थळी जाऊन कामगारांच्या या किटचे वाटप करण्यात येत आहे. अर्थात यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com