Sambhajinagar Corporation : मालमत्ता कर सवलतीसाठी आता सेवन स्टार योजना; सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचाही समावेश

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून आतापर्यंत लागू असलेल्या सवलत योजनेत बदल करण्यात येणार आहे.
Saam tv
Sambhajinagar CorporationSambhajinagar Corporation
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडून मालमत्ता कर वसुली केली जात असते. ही वसुली वाढविण्यासाठी कर धारकांना विशिष्ट अशा सवलती दिल्या जात असतात. त्यानुसार (sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मालमत्ता कर सवलतीसाठी सेवन स्टार योजना अर्थसंकल्पात जाहीर केली. ही सवलत नव्या आर्थिक वर्षात लागू करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Saam tv
Manmad Bajar Samiti : मनमाड बाजार समिती बंद; हमाली, तोलाई, भराई कपात संदर्भाचा निर्णय लांबला

छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून आतापर्यंत लागू असलेल्या सवलत योजनेत बदल करण्यात येणार आहे. महापालिकेने (Corporation) आतापर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेल्या मालमत्ता धारकांना सामान्य मालमत्ता करात तब्बल २५ टक्के सवल दिली जात होती. तसेच सौर ऊर्जा यंत्रणा (Solar Enargy) बसवलेल्याना ५ टक्के सवलतीचा लाभ मिळत होता. मात्र आता चालू आर्थिक वर्षापासून ही सवलत बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Saam tv
Shirpur Crime News : बहिणीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न

१० टक्क्यापर्यंत सवलत 

संभाजीनगर महापालिकेची सुरु असलेली योजना बंद करण्यात आली असून नव्या आर्थिक वर्षांपासून नवीन सेवन स्टार योजना सुरू केली आहे. या योजनेत सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सवलतीचा समावेश नव्या योजनेत करण्यात आला असून मालमत्ता धारकांना करत ६ ते १० टक्केपर्यंत सवलत मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com