Sambhajinagar Accident : टेम्पो- दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sambhajinagar News : नागपूर- मुंबई महामार्गावर वैजापूर तालुक्यातील लासूरगाव शिवारात हा अपघात घडला. महामार्गावरून एका भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली
Sambhajinagar Accident
Sambhajinagar AccidentSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात (Accident) वैजापूर तालुक्यातील लासुरगाव शिवारात घडला.  (Latest Marathi News)

Sambhajinagar Accident
Lok Sabha Election : मद्य विक्री ३० टक्क्यांवर वाढल्यास परवानाधारकांची होणार चौकशी; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदेश

नागपूर- मुंबई महामार्गावर वैजापूर तालुक्यातील लासूरगाव शिवारात हा अपघात घडला. महामार्गावरून (Sambhajinagar) एका भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला. (Nagpur) नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गाजवळ लासुर गावातील निसार उर्फ बबलू करीम कुरेशी हे आपल्या दुचाकीने लासुर गावात जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि या धडकेत दुचाकीवर असलेल्या निसारचा जागीच मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar Accident
Dharashiv crime : चालकाची चलाखी! ATM मध्ये भरण्याऐवजी बॅंकेचे ₹ ८५ लाख घेऊन पळाला; कर्नाटकापर्यंत तपासचक्रे फिरली अन्...

पोलिसांकडून पंचनामा 

दरम्यान सदर अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत अपघातातील मृतास पुढील तपासणीसाठी लासुर स्टेशन येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com