माेर्चानंतर संभाजी भिडेंनी महाराष्ट्राच्या जनतेस केले 'हे' आवाहन

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide

सातारा : एकादशीच्या दिवशी उभ्या महाराष्ट्रातील सुमारे 38 हजार सहाशे गावांमध्ये विठ्ठलाची आरती करुया असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानाचे shivprathishtan hindusthan मार्गदर्शक संभाजी भिडे (गुरुजी) sambhaji bhide यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. दरम्यान शासकीय अधिका-यांना तुमच्या नाेकरीला, तुमच्या कर्तव्याला धक्का लागणार नाही याचे आश्वासन मी तुम्हांला देताे असेही संभाजी भिडे यांनी नमूद केले. (sambhaji-bhide-bandatatya-karadkar-wari-2021-ashadhi-ekadashi-satara-news)

ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या क-हाडकर bandatatya karadkar यांना पाेलिसांनी स्थानबद्ध केल्याने शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानाने आज (साेमवार) क-हाड तहसील कार्यालयावर माेर्चा काढला. या माेर्चात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे मार्गदर्शक संभाजी भिडे हे देखील सहभागी झाले हाेते. माेर्चानंतर संभाजी भिडे यांनी बंडातात्या क-हाडकर यांची करवडी (ता. क-हाड) येथील गाेपालन केंद्रावर जाऊन भेट घेतली. यावेळी संभाजी भिडे म्हणाले कुटंब चालविणारे शासन असते.

वारीला बंदी घालणे ही फार माेठी अपराधाची गाेष्ट शासनाने केली आहे. या राष्ट्राला या धर्माला या समाजाला ज्याच्यामुळे राष्ट्र म्हणून जगण्याची ताकद मिळती ते म्हणजे वारी. वारीला बंदी म्हणजे हिंदूस्थानच्या समाजाच्या श्वासाेश्वास बंदी घालण्यासारख्या आहे. फार माेठी चूक केली आहे. द्राैपदीच्या पदराला हात घालणारा दू:शासन, दूर्याेधन जितका नीच, निर्लज्ज तसेच कृत्य महाराष्ट्र शासनाने केले आहे अशी जहरी टीका संभाजी भिडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

भिडे म्हणाले वास्तविक उद्धवराव ठाकरे, अजितराव पवार, विश्वजीतराव कदम ही फार चांगली माणसे आहेत. ते शासन चालवितात. पुत्र चुकेल, मुर्खपणाचा निर्णय घेईल, पुत्र अपराध करेल. पण आई त्यास क्षमा करेल. तसंच आपण त्यांना क्षमा करुया. त्यांनी केलेली चूक तत्कळा दुरुस्त केली पाहिजे. हे संत काेण आहेत हाे ? ते काय पगारी नाेकर आहेत का असा प्रश्नही भिडे यांनी केला. बंडातात्या यांच्या सारखे संत हे पैसे देऊन पॅकेज देऊन मिळत नाहीत.

Sambhaji Bhide
शववाहिनी गंगा पाहिली, प्रेतवाहिनी चंद्रभागा होऊ देणार नाही

शेकडाे वर्षांपासून वारीला जे जातात ते स्वतःसाठी जात नाहीत. साक्षात्कार घडविणारी वारी असते. हरी म्हणजे काय भगवंत. विठ्ठल, पांडूरंग, माऊली. शेकडाे वर्षापासून सुरु असलेल्या या वारीने इस्लमी गुलामीत अडकलेल्यांना निष्ठा, त्याग, समर्पण शिकविले. वारी रद्द करण्याचा निर्णय घेणा-या या सरकाराची बुद्धी डागाळली आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्र घातकी निर्णय घेतला आहे असेही भिडे यांनी नमूद केले.

ते म्हणाले यंदा पालखी मार्गावरुन वारी जाणार नाही. त्यामुळे वारी ज्या ज्या मार्गाने जाते. जिथे जिथे पालखीचे मुक्काम हाेतात. त्या त्या मुक्कामाच्या ठिकाणी परिसरातील गावातील लाेकांनी एकत्र येऊन मुक्काम करा. शासन विराेध करेल. विराेध माेडून काढा असे सांगून भिडे यांनी आपण सगळ्यांनी डाेक्यावर टाेपी, भगवा झेंडा घेऊन सामील व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गंगेच्या प्रवाहास, सूर्याची किरणांना विराेध हाेऊ शकत नाही असेही भिडे यांनी नमूद केले. दरम्यान तिघांनी (राज्य सरकारने) बंडातात्या क-हाडकरांवर लादलेली बंदी उठवावी त्यांची क्षमा मागावी अशी मागणीही भिडे यांनी केली.

Sambhaji Bhide
अनलाॅक जाहीर करण्याची घाई जिल्हाधिकाऱ्यांनी का केली?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com