शववाहिनी गंगा पाहिली, प्रेतवाहिनी चंद्रभागा होऊ देणार नाही

विद्राेही सांस्कृतिक चळवळ
विद्राेही सांस्कृतिक चळवळ

सातारा : कोरोना सारख्या महामारीच्या corona pandemic काळात गर्दी करून जमाव जमवून मृत्यूचे कारण बनवून लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळा अशी वारकरी varkari संप्रदाय अथवा वारकरी संतांची शिकवणच नाही असे असताना पंढरपूरला जाण्यासाठी आषाढी वारीला परवानगी द्या अशी मागणी करणे म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आरोग्याशी खेळणे होईल. वारीला परवानगी द्या अशी मागणी करणा-यांना प्रेतवाहिनी चंद्रभागा करायची आहे का? असा सवाल विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आला आहे. (do-not-permit-wari-demands-vidrohi-sanskrutik-chalval-maharashtra-satara-news)

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या वतीने कार्याध्यक्ष तसेच बडवे उत्पात आंदोलनातील प्रमुख नेते कॉम्रेड धनाजी गुरव आणि उपाध्यक्ष विजय मांडके यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात, " अठरापगड जातीतील बहुजन समाजातील वारकरी संतांना ज्या प्रवृत्तींनी छळले. त्याच प्रवृत्तीचे काही मूठभर लोक आज वारीला परवानगी द्या अशी मागणी करत आहेत. म्हणजेच ज्यांचा वारीशी काही एक संबंध नाही त्यांनी वारीला परवानगी द्या म्हणणे असे झाले.

विद्राेही सांस्कृतिक चळवळ
पोलिसांना त्रास होईल असे मी वागणार नाही : बंडातात्या कऱ्हाडकर

कोरोनासारख्या महामारीच्या काळात यांना वारकरी, वारकरी संत आणि पंढरीची वारी आठवू लागली आहे. वारकरी संप्रदायात त्यांना कवडीचीही किंमत नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे. भगवा तुक्याचा आणि बामणी कावा संघाचा हे आता सर्वांना कळून चुकले आहे म्हणूनच आता वारीला परवानगी द्या म्हणणारे जे कुणी आहेत त्यांना वारकर्‍यांच्या आरोग्याची काही देणे घेणे नाही असेच वाटते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांना साथीच्या रोगात ढकलण्याचा त्यांचा डाव आहे असेच म्हणावे लागेल असेही पत्रकात नमूद करण्यात आले.

याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनाचा हा संसर्ग वारी सुरू झाल्यावर गावोगावी पोहोचेल आणि कोरोना सर्वदूर पोहोचल्यानंतर तो आटोक्यात आणणे कठीण होईल याची जाण वारीला परवानगी द्या म्हणणाऱ्यांना नसावी याच्या इतके दुर्दैव नाही. कुंभमेळ्याला परवानगी दिल्यानंतर ज्याप्रमाणे त्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला त्याच पद्धतीने वारीच्या मार्गावरही हा प्रसार होईल यात शंकाच नाही. त्यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य जपणे व वारकरी आणि शेतकरी यांना जपणे हे महत्त्वाचे असल्याने आम्ही वारीला परवानगी देऊ नये याच विचाराचे आहोत.

राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय वारकऱ्यांच्या दृष्टिने अतिशय योग्य आहे. कुंभमेळ्यानंतर शववाहिनी गंगा पाहिली आता आम्ही प्रेतवाहिनी चंद्रभागा होऊ देणार नाही. त्यामुळेच आमचा वारीला परवानगी देऊ नये यासाठी आग्रह कायम राहील असे कॉम्रेड धनाजी गुरव व विजय मांडके यांनी स्पष्ट केले आहे.

विद्राेही सांस्कृतिक चळवळ
तब्बल 50 माेबाईल चाेरणारा सातारा पाेलिसांच्या जाळ्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com