तब्बल 50 माेबाईल चाेरणारा सातारा पाेलिसांच्या जाळ्यात

Satara Crime News
Satara Crime News

सातारा : सातारा शहर आणि परिसरातून तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे 50 मोबाईल mobile phone चोरी करणाऱ्या बहाद्दरास सातारा शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे जप्त केलेल्या मोबाईलमध्ये महागड्या मोबाईलच्या माॅडेलचा समावेश आहे. पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव विकास खंडागळे (राहणार : प्रतापसिंहनगर) असे आहे. (satara-crime-detection-branch-arrested-youth-50-mobile-phones-seized)

चोरी केलेले मोबाईल स्वतःचे असल्याचे सांगून लोकांना विक्री करत असताना संशयित विकास खंडागळे यास पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्याच्याकडून 50 मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलची किंमत सुमारे पाच लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

येथील शिवराज पेट्राेल पंपाच्या शेजारी संभाजीनगर येथे नवीन बांधकाम सुरु असलेल्या साईटवरील चाेरीस गेलेले माेबाईल हे प्रतापसिंहनगर येथील एकाने चाेरल्याचे असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचा-यांनी एक जूलैला संबंधित संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केल्यानंतर त्याने शिवराज पेट्राेल पंपाच्या शेजारी संभाजीनगर येथील साईटवरचा माेबाईल चाेरी केल्याचे निष्पन्न झाले.

संबंधित आराेपीस अटक केल्यानंतर त्याच्याकडे अधिक चाैकीश केल्यानंतर त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून माेबाईल चाेरल्याचे सांगितले. त्यानंतर पाेलिसांनी आराेपीकडून 50 माेबाईल फाेन हस्तगत केले. या मुद्देमालाची किंमत सुमारे पाच लाख 700 रुपये असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पाेलिस अधीक्षक आंचल दलाल, पाेलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पाेलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पाेलिस हवालदार गुलाब जाधव, पाेलिस नाईक अविनाश चव्हाण, जाेतीराम पवार, शिवाजी भिसे, काॅन्स्टेबल गणेश घाडगे, अभय साबळे, संताेष कचरे, गणेश भाेंग व विशाल धुमाळ यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Satara Crime News
पोलिसांना त्रास होईल असे मी वागणार नाही : बंडातात्या कऱ्हाडकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com