पोलिसांना त्रास होईल असे मी वागणार नाही : बंडातात्या कऱ्हाडकर

Bandatatya Karadkar
Bandatatya Karadkar
Published On

कऱ्हाड (जि. सातारा) : पोलिस हे वरिष्ठांच्या हुकमाचे बंदे आहेत. पोलिस माझ्यावर नजर ठेवतील. मात्र, माझ्या काही आक्रमक वागण्याने पोलिसांना त्रास होईल, असे मी वागणार नाही असे व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, कीर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर bandatatya karadkar यांनी सांगितले. करवडी (ता. कऱ्हाड) येथील बंडातात्यांच्या गोपालन केंद्रात शनिवारपासून त्यांना व त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. दरम्यान पाेलिस विभागाने या केंद्रांत वारक-यांसमवेत फराळाचा आनंद लुटला. (satara-marathi-news-bandatatya-karadkar-karad-police-pandharpur-wari-2021)

दरम्यान, बंडातात्या कऱ्हाडकर यांनी वारकरी संप्रदायाचे चाकोरीबद्ध चाललेले आंदोलन पोलिसांनी नुकतीच मोडीत काढले. त्यामुळे ज्ञानेश्वर, तुकारामांच्या पालख्यांना केलेला विरोध शासनाला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आळंदीवरून पंढरपूरला पायी वारीने जाण्यासाठी निघालेल्या बंडातात्या कऱ्हाडकर व सहकाऱ्यांना पुणे परिसरातून पोलिसांनी शनिवारी (ता.3) ताब्यात घेऊन करवडी गोपालन केंद्रात आणून स्थानबद्ध केले आहे. पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेले दाेन दिवस या केंद्राच्या बाहेर पाेलिस बंदाेबस्त आहे. काेण येत आहे यावर लक्ष ठेवले जात आहे. बंडातात्या आणि त्यांचे सहकारी पाेलिसांची काळजी घेताहेत. त्यांना काय हवयं काय नकाे याची विचारपूस करीत असतात. वारकरी पाेलिसांना फराळ देतात.

Bandatatya Karadkar
कोयना धरणाच्या लाभक्षेत्रातील जमिनी १५ दिवसांत द्या अन्यथा...

दरम्यान बंडातात्या यांनी आपली भुमिका पुन्हा एकदा नुकतीच स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ‘‘संप्रदायाच्या चाकोरीतून चाललेले आंदोलन पोलिसांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मला आणि पांडुरंग घुले महाराज यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे. आषाढी वारी व कोरोनाचा विचार करता वारकऱ्यांचे आक्रमक आंदोलन न करता पोलिसांचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. समस्त वारकऱ्यांचा विचार करून आम्ही सध्या वारकऱ्यांना शांततेचे आवाहन करत आहे. याबाबत नंतर आंदोलन केले जाईल; परंतु आता वारकऱ्यांनी संयम ठेवावा. वारी सुरू झालेली आहे. ती पोचणार आहे. कित्येक वारकरी आळंदीतून पांडुरंगाजवळ पोचलेही आहेत. वारीपेक्षा ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांची पायी पालखी वारी झाली पाहिजे, हा आमचा अट्टहास होता.’’

Bandatatya Karadkar
माेठा भ्रष्टाचार पुढं येईल; पृथ्वीराज चव्हाणांना विश्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com