Samata Nagari Urban Cooperative Credit Society
Samata Urban Cooperative Credit Society branch amid allegations and investigation orders by the Cooperative Commissioner.saam tv

Samata Nagari Cooperative Credit Society: राज्यात ३० शाखा, ११०० कोटींच्यावर ठेवी अन् ठेवीदारांचा जीव टांगणीला, समता पतसंस्थेचा नेमका काय आहे प्रकार?

Samata Nagari Urban Cooperative Credit Society : समता पतसंस्थेत राज्यात ३० शाखा आहेत, यात ११०० कोटींच्यावर ठेवी आहेत. त्याचदरम्यान पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं गुंतवणुकदारांचा जीव टांगणीला लागलाय.
Published on
Summary
  • संस्थेवर झालेल्या आरोपांनी ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

  • कोपरगावमधील राजकीय वातावरण तापले आहे.

  • चौकशीचे आदेश दिल्याने पतसंस्थेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

राज्यातील अग्रगण्य म्हणून गणल्या जाणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याने पतसंस्थेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.. तर समता पतसंथेवर झालेले आरोप राजकीय हेतूने केले जात असल्याची प्रतिक्रिया संचालक संदिप कोयटे यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्जदार वसंत घोडके यांनी समता पतसंस्थेवर 40 कोटींची जमीन 5 कोटींना परस्पर विकल्याचा आरोप केला आहे. घोडके यांच्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या संचालकांसह सात जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. यासह कर्जदार संजय मोरे, ओमप्रकाश खके आणि वसंत घोडके यांनी केलेल्या तक्रारीनंतर सहकार आयुक्तांनी समता पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिल्याने पतसंस्थेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Samata Nagari Urban Cooperative Credit Society
CIDCO Home : नवी मुंबईत फक्त २२ लाखात घर, सिडकोची प्राईम लोकेशनवर लॉटरी

समता पतसंस्थेत राज्यातील 30 शाखेत 1100 कोटींच्यावर ठेवी आहेत. मात्र संस्थेवर झालेल्या आरोपांनी ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान पतसंस्थेवर होणारे आरोप चेअरमन संदीप कोयटे यांनी फेटाळून लावले आहेत. सभासदांचा संस्थेवर विश्वास असून केवळ संस्थेचे संस्थापक काकासाहेब कोयटे हे कोपरगाव नगराध्यपदाची निवडणूक लढवत असल्याने संस्थेवर होणारे आरोप हे राजकीय षडयंत्र असल्याचं कोयटे यांनी म्हटलंय. तर कुठलीही चौकशी झाली तरी आम्ही सामोरे जाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया संदिप कोयटे यांनी दिली आहे.

Samata Nagari Urban Cooperative Credit Society
Badlapur Crime: सर्पदंश, ब्रेन हॅमरेज, नंतर हत्येची उकल; डोके चक्रावून टाकणारं बदलापुरातील निरजा आंबेरकर हत्याकांड

समता पतसंस्थेच्या संचालकांवर दाखल झालेले गुन्हे आणि सहकार विभागाने लावलेली चौकशी यामुळे कोपरगावमधील राजकीय वातावरण तापले आहे.. पतसंस्थेचे संस्थापक काका कायटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याने पालिका निवडणुकीत हा मुद्दा गाजणार हे मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com