Salman Khan: सलमान खानच्या हाती भगवं राम मंदिराचं घड्याळ, मौलानांचा संताप; म्हणाले 'सलमानने गैर इस्लामी'..

Salman Khan for Wearing Ram Temple Watch: सलमान खान राम मंदिर एडिशन घड्यामुळे अडकला वादाच्या भोवऱ्यात. मौलानांनी व्यक्त केला संताप. म्हणाले, 'सलमान खानने राम एडिशनचं घड्याळ हातात घालणं योग्य नाही'.
Salman
SalmanSaam
Published On

अभिनेता सलमान खान सध्या सिकंदर चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिकंदर हा चित्रपट ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सलमान व्यग्र आहे. सिकंदर चित्रपटाव्यतिरिक्त सलमान आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे आणि चर्चेचं कारण म्हणजे, ३४ लाखांचं घड्याळ.

सलमानने नुकतंच एक फोटोशुट केलं होतं. त्याच्या हातामध्ये एक घड्याळ दिसत आहे. घड्याळाचं वैशिष्ट्य म्हणजे, या घड्याळ्याच्या डायलवर अयोध्येतील राम मंदिर दिसत आहे. तसेच भगवान राम आणि हनुमान दिसत आहेत. या घड्याळ्याची चर्चा सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात झाली. पण यावरून मौलाना संतपाले आहेत. 'सलमान खानने राम एडिशनचं घड्याळ हातात घालणं योग्य नाही', असे ते म्हणाले आहेत.

मौलवी नेमकं काय म्हणाले?

सलमान खानने राम एडिशनचे घड्याळ घालताच उत्तर प्रदेशातील मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी संताप व्यक्त केला आहे. 'सलमान खान हा प्रसिद्ध मुस्लिम अभिनेता आहे. राम मंदिराच्या प्रचारासाठी राम जन्मभूमीचं चित्र असलेलं त्याने घड्याळ हातात घातलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियात शेअरही केले आहेत.

Salman
Jalgaon Crime: अनैतिक संबंधाचं भूत डोक्यात शिरलं, नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला; घरात रक्ताचा सडा

शरियतनुसार, जर कुणीही व्यक्ती मग तो सलमान खान का असेना, राम मंदिरांचा प्रचार, गैर इस्लामी संस्थांचा किंवा धार्मिक गोष्टींचा प्रचार करत असेल तर, ती कृती हराम आहे. हे कृती करणाऱ्या व्यक्तीने माफी मागावी. यापुढे तसं गैर मुस्लिम धार्मिक गोष्टींचा प्रचार करणार नाही, याचं आश्वासन द्यावं', असंही मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी म्हणाले आहेत. तसेच त्यांनी सलमानला माफी मागण्याचा सल्लाही दिला आहे. मौलाना शहाबुद्दीन हे ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष आहेत.

Salman
Dombivali News: गुढी पाडव्याच्या दिवशी डोंबिवलीतील फडके रोड असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? वाचा

सलमानच्या घड्याळावरून वाद का पेटला?

सलमान खान सध्या त्याच्या सिकंदर चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याने नुकतेच काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. फोटोमध्ये त्याच्या हातात एक घड्याळ दिसत आहे. या घड्याळ्याची चर्चा जोरदार होत आहे. घड्याळ्याचा रंग भगवा आहे. तसेच घड्याळ्याच्या डायलवर रामजन्मभूमी दिसत आहे. हे घड्याळ जेकब अँड कंपनी एपिक एक्स रामजन्मभूमी टायटॅनियम एडिशन ३ चे आहे. हे घड्याळ लिमिटेड एडिशन असून, त्याची किंमत ३४ लाख रूपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com