पुणे, महाराष्ट्र : सकाळ माध्यम समूहाच्या शेत मार्केट या पॉडकास्टला 'दि वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूज पब्लिशर्स' (WAN-IFRA)चे बेस्ट पॉडकास्ट गटातील सुवर्णपदक मिळाले आहे. शेतमार्केट हे शेतीमधले मार्केट इन्टेलिजन्स सांगणारे मराठीतील पहिले पॉडकास्ट आहे.
WAN-IFRA ने २०२२ या वर्षासाठीच्या दक्षिण आशियाई डिजिटल मीडिया पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली. त्यात बेस्ट पॉडकास्ट गटातील सर्वोच्च सन्मानासाठी शेतमार्केट पॉडकास्टची निवड करण्यात आली. WAN-IFRAकडून दिले जाणारे पुरस्कार माध्यम क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. शेतमार्केट या पॉडकास्टला हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अॅग्रोवनच्या या वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल प्रॉडक्टची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.
शेतमार्केट पॉडकास्टमध्ये शेती क्षेत्रातील विविध विषयांचा वेध घेतला जातो. त्यात मार्केट इन्टेलिजन्स, पीक व्यवस्थापन, उद्योग क्षेत्रातील घडामोडी, धोरणात्मक निर्णय अशा अनेक बाबींचा समावेश असतो. त्याच प्रमाणे या पॉडकास्टमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मुलाखतीही घेतल्या जातात. त्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांना नवा दृष्टिकोन देणारी माहिती मिळते. (Latest Marathi News)
शेतमार्केट पॉडकास्टच्या या यशाबद्दल सकाळ मीडिया डिजिटल हेड स्वप्नील मालपाठक म्हणाले, 'आम्ही लोकांना शेतीविषयी निर्णयक्षम आणि विश्लेषणात्मक माहिती देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेतली गेली. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे.' आमची टीम उच्च गुणवत्तेचा उपयुक्त, माहितीपूर्ण आणि खिळवून ठेवणारा आशय निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेते. हा पुरस्कार म्हणजे त्यांचे परिश्रम आणि समर्पण यांना मिळालेली पावती आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.