Saam Exit Poll : अमरावतीतून कोण निवडून येणार? एक्झिट पोलमधून संभाव्य आमदाराचं नाव आलं समोर

Amravati vidhan sabha election maharashtra Exit Poll : अमरावती मतदारसंघात एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अजित पवार गटाच्या सुलभा खोडके या विजयी होऊ शकतात, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, २३ तारखेलाच चित्र स्पष्ट होईल.
Amravati Sulbha Khodke Vs Sunil deshmukh
Amravati Sulbha Khodke Vs Sunil deshmukhsaam tv
Published On

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुलभा खोडके यांना मतदारांनी कौल दिल्याचं एक्झिट पोलच्या अंदाजातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे खोडके या अमरावतीच्या संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे.

अमरावती मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुलभा खोडके आणि काँग्रेसचे सुनील देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली. या निवडणुकीसाठी काल, बुधवार, २० नोव्हेंबरला मतदान झालं. आता २३ तारखेला निकाल लागणार आहे. तत्पूर्वी मतदान झाल्यानंतर सकाळ समूहानं घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये या मतदारसंघातून सुलभा खोडके या संभाव्य आमदार असतील, असं सांगण्यात आलं आहे. खोडके यांच्यासमोर काँग्रेसच्या देशमुख यांचं तगडं आव्हान होतं.

सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अमरावती मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील निवडणुकीत सुलभा खोडके यांनी काँग्रेसचे प्रतिनिधीत्व केले होते. तर या निवडणुकीच्या आधी खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. काँग्रेसकडून सुनील देशमुख हे रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली.

Amravati Sulbha Khodke Vs Sunil deshmukh
SAAM Exit Poll : श्रीरामपूरमध्ये हेमंत ओगले होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता देखील निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळं मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीत अल्पसंख्याकांची मते निर्णायक ठरली होती. आता विधानसभा निवडणुकीत ही मते कुणाच्या पारड्यात पडतात, यावर येथील संभाव्य आमदार ठरणार आहे, असे बोलले जात आहे. दरम्यान, हे एक्झिट पोलमधील प्राथमिक अंदाज आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार हे २३ तारखेलाच स्पष्ट होईल.

Amravati Sulbha Khodke Vs Sunil deshmukh
SAAM Exit Poll: देवळालीमधून सरोज अहिरे होणार आमदार? पाहा EXIT POLL

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com