भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी खूपच महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यामागचे कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढवली आहे.
नाना पटोले यांच्या विरोधात महायुतीने भाजपचे अविनाश ब्राम्हणकर यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघामध्ये नाना पटोले आणि अविनाश ब्राम्हणकर यांच्यात प्रमुख लढत झाली. या दोघांपैकी कोण विजयी होणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
सकाळच्या एक्झिट पोलनुसार, साकोली मतदारसंघामध्ये नाना पटोले हे संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे. नाना पटोले भाजपच्या अविनाश ब्राम्हणकर यांचा पराभव करण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसला पुन्हा गड राखण्यात यश येण्याची शक्यता आहे. साकोली मतदारसंघातील नागरिकांनी पुन्हा नाना पटोले यांना पसंती दिली आहे.
नाना पटोले गेल्या २५ वर्षांपासून साकोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. पण त्यांनी काहीच चांगली कामं न केल्यामुळे नागरिक नाराज होते. असे असतानाच या मतदारसंघामध्ये भाजपच्या मतांचे विभाजन झाल्यामुळे याचा फायदा नाना पटोले यांना होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय होऊन भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.