Shirdi Saibaba Mandir: ३१ डिसेंबरला रात्रभर साई समाधी मंदिर खुले राहणार

Shirdi Mahotsav: साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेऊन शिर्डी येथील साई समाधी मंदिर ३१ डिसेंबरला दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार आहे.
shirdi saibaba mandir
Shirdi SaibabaSaam tv
Published On

सचिन बनसोडे, शिर्डी

Shirdi Sai Baba Temple: नाताळ, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईबाबा संस्थानाच्या वतीनं शिर्डी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आलं आहे. साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेता, साई समाधी मंदिर ३१ डिसेंबरला दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार आहे. याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.

'दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्‍वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणार्‍या सर्व भाविकांना साईबाबांच्या समाधीचे दर्शन मिळावे, तसेच गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने शिर्डी साई समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार आहे,' अशी माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.

shirdi saibaba mandir
Shirdi Accident: विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली, नगर - मनमाड महामार्गावरील घटना

यादरम्यान ३१ डिसेंबर रोजीची शेजारती आणि १ जानेवारीची (नवीन वर्ष २०२५) पहाटेची काकड आरती होणार नाही.

नाताळ आणि नवर्षाच्‍या सुट्टीच्या गर्दीमुळे २५ डिसेंबर त १ जानेवारी असे ७ दिवस वाहन पूजा बंद राहणार आहे.

नाताळ सुट्टीच्या कालावधीत श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा सुरू राहील.

मुख्य म्हणजे मंदिर आणि परिसरात फटाके आणि वाद्य वाजवण्‍यास मनाई करण्‍यात आली असल्याचंही कोळेकर यांनी सांगितलं.

सुरक्षिततेच्या दृष्‍टीनं या नियमांचे पालन करावे, असे आवाहन कोळेकर यांनी केलंय.

shirdi saibaba mandir
Shirdi News : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी..फुल हार नेण्यास घातलेली बंदी उठवली; तीन वर्षानंतर वाहता येणार समाधीवर फुले

हा महोत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी तसंच सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि सर्व कर्मचारी प्रयत्‍नशील असतील. सुट्ट्यांच्या काळात संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांचे दर्शन सुकर व्हावे, यासाठी साई संस्था विविध उपाययोजना राबवत आहे. त्यामुळे भाविकांना ३१ डिसेंबरला रात्रीही दर्शन घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com