Parbhani Political News : राष्ट्रवादीच्या आमदारांनी असं कसं केले? परभणीमध्ये शिवसेनेची खदखद

पाथरी तालुकास्तरावर नव्याने स्थापित झालेली संजय गांधी निराधार योजना समिती ही शासन नियमाप्रमाणे झाली नसल्याची तक्रार शिवसेनेने जिल्हाधिका-यांकडे केली.
saeed khan opposed name babaji durrani in sanjay gandhi niradhar yojana
saeed khan opposed name babaji durrani in sanjay gandhi niradhar yojana saam tv
Published On

Parbhani :

परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटाचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षातीलच कार्यकर्ते विविध समितीवरील पदावर असावेत अशी अपेक्षा करु लागले आहेत. त्यातूनच शिवसेना त्यांच्या सहकारी पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांच्या नावावर आक्षेप घेऊ लागले आहेत. यामुळे आगामी काळात परभणी येथे शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांची दिलजमाई राहणार की नाही अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. (parbhani latest marathi news)

पाथरी तालुकास्तरावर नव्याने स्थापित झालेली संजय गांधी निराधार योजना (sanjay gandhi niradhar yojana) समिती ही शासन नियमाप्रमाणे झाली नसल्याने ही समिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान (saeed khan pathri) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. (Maharashtra News)

saeed khan opposed name babaji durrani in sanjay gandhi niradhar yojana
APMC Market Vashi: एपीएमसीत लाल मिरचीची आवक वाढली; भाव काेसळला

निराधार योजनेचा अध्यक्ष हा सामाजिक कार्यकर्ता असण्याचा नियम असताना, स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी (babaji durrani) यांना केल्याने शिवसेनेचे नेते सईद खान यांनी विरोध करून समिती रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेना नेते व महाराष्ट अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी ह्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची वर्णी अध्यक्ष पदावर लावली असल्याचा आरोपही खान यांनी केला आहे. त्याचा विरोध करत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत समिती रद्द करण्याची मागणी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

saeed khan opposed name babaji durrani in sanjay gandhi niradhar yojana
Success Story : भंडा-यातील शेतक-याच्या जीवनात पेरुने निर्माण केला गोडवा, 10 लाखांची कमाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com