मुंबई : शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या चेहऱ्यावरून खोचक टीका केली. सदाभाऊ यांच्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
सांगलीतील जत तालुक्यात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, 'बहुजन समाजाचा ढाण्या वाघ या जत मतदारसंघांमध्ये उभा आहे. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष जतकडे लागलं आहे. काही लोक बाहेरून आल्यांचं ओरडत आहेत. बाहेरून कुठूनं आले? काय पाकिस्तानमधून आले? बहुजन समाजाचा नेता हा जतचा विकास करायला आला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या खांद्याला खांदा लावायला देवेंद्र फडणवीस जतमध्ये आले आहेत'.
'येथील आमदाराला विचारावं की, जतमधील पाणी प्रश्न, दुष्काळ या प्रश्नावर विधानसभेत बोलला काय? काँग्रेसचा आमदार म्हणजे बहिरा आणि मुका आहे. आंधळा आहे, वाचता येत नाही, लिहायला येत नाही. ज्यांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडले आहे. त्यांच्या मुलाला जतमधून उभा करण्याचे स्वप्न पाहिले. साहेबांच्या लक्षात आलं की, लाडक्या बहिणीला पण आता महिन्याला पंधराशे देत आहेत. आता परत वाढ करणार असून महिन्याला 2100 देणार आहोत. त्यामुळे बायकोशी गोड बोला. कमळाला बटन दाबायचं, नाही तर 2100 बंद होणार, असे खोत पुढे म्हणाले.
'देवेंद्र फडणवीस यांना घेराव का लागलं, माहीत आहे का? राज्याचे तिजोरी गाय आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसवाले यांनी देवेंद्र फडणवीसांना घेरले. कारण तिजोरी गाय आहे. त्याला चार थाने आहेत. एक थान जनतेला आणि 3 थान आपल्याला आहेत, असे खोत पुढे म्हणाले.
'शरद पवार यांना 9 महिना लागला आणि कळा फुटल्या. पण शरद पवारांना मानावं लागेल. शरद पवार सांगत सुटले आहेत की, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. त्यांना कसला चेहरा बदलायचा आहे. त्यांच्या चेहऱ्यासारखं राज्य बदलणार का, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली.
'बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व गाजवत ठेवलं. पण उद्धव ठाकरे यांनी दाढ्या कुजळत बसले. देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेवर आले, तर शेतकऱ्यांचा सर्व कर्ज माफ होणार आहे. जतचा विजय मोठा असणार आहे. जतला मंत्रिपद पाठवायचं, मी साहेबांच्या कानात सांगतो. मला पण मंत्रिपद द्या, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.