
Republic day 2023: आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र झेंडावंदन केले जाते. शाळा, महाविद्यालय, कार्यालये अशा विविध ठिकाणी झेंडावंदन घेतले जाते. आपल्या भारताचा ध्वज आज अभिमानाने सर्व जण बिल्ल्या स्वरूपात छातीवर लावून मिरवतात. सकाळीच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलेले असते. अनेक व्यक्ती आपल्या वाहनांवर देखील झेंडा फडकवतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का? झेंडा कोणीही कोणत्याही वाहनावर लावू शकत नाही. (Latest Republic day 2023 News)
आपल्या देशात 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन्ही दिवशी झेंड्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अनेक दुकानांमध्ये तिरंगे विविध पद्धतीने विकले जातात. यात स्टेशन जवळ आणि सिग्नलवर बऱ्याचदा लहान मुलं देखील झेंड्याची विक्री करताना दिसतात. अशात वाहांनार देखील अनेक व्यक्ती दिमाखात झेंडा फडकवतात. मात्र या बाबत देखील काही नियम आहेत. अनेक सामान्य नागरिकांना हे नियम माहीत नाहीत. त्यामुळे आज ते नियम नेमके कोणते हे पाहूया. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुमच्यावर योग्य ती कारवाई होऊ शकते.
भारतीय ध्वज संहिता
भारतीय ध्वज संहितेत यासाठी नियम देण्यात आले आहेत. यामध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या मर्जी नुसार आपल्या वाहनावर भारताचा ध्वज लावू शकत नाही. परिच्छेद 3.44 नुसार ज्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत त्यांच्याच वाहनांवर झेंडा लावता येतो. अनेक व्यक्ती आपली बाईक, स्कूटर, रिक्षा, चारचाकी अशा सर्वच वाहनांना झेंडा लावतात. मात्र अशा व्यक्तींवर परिच्छेद 3.44 नुसार कारवाई केली जाऊ शकते.
काय आहेत नियम
भारतीय ध्वज संहिता 2022 च्या परिच्छेद 3.44 मध्ये देण्यात आलेल्या नियमांनुसार राष्ट्रपती आपल्या वाहनांवर झेंडा लावू शकतात. तसेच उपराष्ट्रपती, राज्यपाल, राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल देखील झेंडा लावू शकतात. त्याचबरोबर पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्री आपल्या वाहनांवर भारताचा ध्वज लावू शकतात.
तिरंगा वाहनांवर फडकवण्यासाठी राज्य उपमंत्री, केंद्रीय उपमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती यांना परवानगी आहे. तसेच राज्य विधान परिषदांचे अध्यक्ष, राज्यासह केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना तिरंगा लावण्यास परवानगी आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.