Alibag: अलिबागची रुची राजन भगत झाली न्यायाधीश; शेतकरी, कष्टकरी वर्गात आनंदाेत्सव

रुचीच्या या यशाने त्यांच्या पालकांनाही सार्थ अभिमान वाटत आहे.
Ruchi Rajan Bhagat
Ruchi Rajan BhagatSaam tv
Published On

- राजेश भोस्तेकर

रायगड : संघर्ष करण्याची पार्श्वभूमी असलेल्या अलिबाग (alibag) तालुक्यातील शहापूरमधील भगत कुटूंबातील रुची राजन भगत (Ruchi Rajan Bhagat) हि पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC) पास होऊन न्यायाधीश (Court Judge) होण्याचा मान मिळविला आहे. रुचीच्या या यशाने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सर्व स्तरातून होऊ लागला आहे. रायगडातील (Raigad) तरुणही आता महाराष्ट्र तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (Maharashtra and State Public Service Commission examination) यश संपादन करू लागले आहेत. आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवलेत तर नक्की यश येते असे रुची हिने सांगितले आहे. (alibag latest marathi news)

शेतकऱ्याच्या न्याय हक्कांसाठी रुची हिचे वडील राजन भगत गेली ३० वर्ष लढा देत आहेत. तर आई (कै.) सुधा भगत या शिक्षिका होत्या. त्यामुळे लहानपणापासून घरातूनच रुची हिला संघर्ष, साहित्य आणि नेतृत्वाचे धडे मिळत होते. शेतकऱ्याच्या (farmers) लढ्यात रुची वडिलांच्या सोबत न्यायासाठी लढत होती. शेतकरी, कष्टकरी या अन्यायग्रस्तांना न्याय व्यवस्थाच न्याय मिळवून देऊ शकते ही भावना रुचीच्या मनात खोलवर रुजली होती. तेव्हाच रुची हिने न्यायाधीश होण्याचे स्वप्न गाठीशी बांधले होते.

Ruchi Rajan Bhagat
Raigad: ११ वर्षाच्या रुद्राक्षीनं धरमतर ते मांडवा पाेहत केलं शिवरायांना अभिवादन

रुची हिने मुंबई नॅशनल लॉ विद्यापीठात कायद्याची पदवी प्रदान केली. त्यानंतर भारतीय संविधान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सन २०२० कालावधीत रुचीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाची पूर्व परीक्षा दिली. या परीक्षेत रुची प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरली. रुची हिने मनात ठरवलेले ध्येय गाठले असून आज त्या दिवाणी न्यायाधीश झाल्या आहेत. रुचीच्या या यशाने त्यांच्या पालकांनाही सार्थ अभिमान वाटत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Ruchi Rajan Bhagat
Maharashtra: 'टोल नाका बंद झाल्यास नितीन गडकरींचा सत्कार अन्यथा तीव्र आंदाेलन'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com