Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांना सोबत घेऊन मोठं बंड पुकारलं आणि शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा दिला. अजित पवारांच्या या निर्णयानंतर राजकारणात हालचालींना वेग आला आहे. एकीकडे काही नेत्यांनी अजित पवारांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (RPI Leader Ramdas Athavale) यांनी अजित पवारांच्या निर्णयाचे आपल्या खास शैलीत कौतुक केले आहे.
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'अजित पवार यांचा निर्णय डेरिंगबाज आहे. त्यांचा निर्णय क्रांतिकारक आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा आहे. देशाचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे.अजित पवार यांनी बंड करत भाजपसोबत यायचा निर्णय घेतला आहे. दादा यांचं आणि त्यांच्यासोबतच्या जेष्ठ नेत्यांचे स्वागत आहे'
तसंच, 'मी शरद पवार यांना एनडीएसोबत येण्याचं आव्हान केलं होतं. तशी भूमिका मी मांडली होती पण त्यांनी ती मान्य केली नव्हती. भाजपसोबत जाण्यासाठी एवढा विरोध करण्याची गरज नव्हती.', असं देखील मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी मित्रपक्षांच्या मंत्रीपदाविषयी देखील प्रतिक्रिया दिली.
त्यांनी सांगितले की, जुन्या अमदारांवर आणि मित्रपक्षांवर अन्याय होण्याचा विषय नाही. जुन्या पक्षांना संधी मिळाली पाहिजे. सगळ्यांना घेऊन महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ. विस्तार होईल तेंव्हा आरपीआयला संधी मिळेल असे फडणवीस म्हणाले होते.उद्या मी त्यांची भेट घेऊन मंत्रिपदाची मागणी करणार आहे. ते ती मान्य करतील.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
इतर राज्यातील पक्षफुटीवर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी सांगितले की,'अशाच प्रकारचा बंड बिहार, उत्तर प्रदेशात होऊ शकतो. नितीश कुमार, जयंत चौधरी, समाजवादी पक्ष यांच्यात देखील फूट पडू शकते.' तसंच, 'एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. डीसकॅलिफिकेशनचा निर्णय होणार नाही. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवू. संजय राऊत यांनी वाद लावण्याचं काम करू नये.', अशी टीका रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे या दोन्ही खासदारांनी अजित पवारांना पाठिंबा देत शपथविधीला उपस्थिती लावली होती. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.