Maharastra Politics: ठाकरे बंधू एकत्र येणार का? राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया, एका वाक्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या

Raj Thackeray Latest News: मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मांध्यमांना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest Newssaam tv
Published On

Will Raj Thackeray and Uddhav Thackeray come together: अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन मोठं बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धक्का राष्ट्रवादीला बसला असला तरी काँग्रेस, मनसे आणि ठाकरे गट देखील सावध झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मांध्यमांना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला. या प्रश्नालाही उत्तर देताना 'मी लवकरच मेळावा घेणार आहे, त्यात सर्व काही स्पष्ट करेल' असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत शिवसेनेसोबत जाण्यावर थेट नकार देणाऱ्या राज ठाकरे यांनी यावेळी नकार न देता मेळाव्यात बोलेन असे म्हणत प्रश्नाला बगल दिली. (Breaking News)

Raj Thackeray Latest News
Praful Patel Statement: पक्ष आणि चिन्ह हे सगळं आमचंच, १० दिवसात पिक्चर क्लिअर होईल; प्रफुल्ल पटेलांची मोठी प्रतिक्रिया

दरम्यान, सोमवारी अजित पवारांच्या बंडानंतर मुबंईतील शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्समधून दोन्ही गटातील नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन शिवसैनिकांकडून करण्यात आलं होतं. याच पोस्टर्सवरून राज ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी थेट उत्तर देणं टाळलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Political News)

Raj Thackeray Latest News
Sharad Pawar News: राष्ट्रवादी फोडणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवणार, शरद पवार यांचा थेट इशारा

अजित पवारांच्या बंडावर राज ठाकरेंना शंका

अजित पवारांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं. पटेल आणि भुजबळ यांना पाठवल्याशिवाय ते जाणार नाहीत, अशी शंका व्यक्त करतानाच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही, असं ते म्हणाले. यांना मतदारांशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका देखील त्यांनी केली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com