Solapur RPF Jawan News: प्रवासादरम्यान आला हार्ट अटॅक, श्वासही थांबला..; देवदूत बनून जवानांनी वाचवले प्राण

Solapur Railway Station: ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान एएसआय अजय महाजन आणि एएसआय एम. पी. सिंह या दोन जवानांनी या प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत.
Solapur RPF Jawan
Solapur RPF Jawan Saam Tv
Published On: 

विश्वभूषण लिमये, सोलापूर

Solapur News: सोलापूरमध्ये (Solapur News) प्रवासादरम्यान एका प्रवाशाला हार्ट अटॅक आला. या प्रवाशाला प्रचंड त्रास होत होता. त्याचा श्वास देखील थांबला. पण देवदूत होऊन आलेल्या आरपीएफ जवानांनी (RPF Jawan) या प्रवाशाचे प्राण वाचवले आहे. सध्या या सीआरपीएफ जवानांचे कौतुक होत आहे.

Solapur RPF Jawan
Train Viral Video: ट्रेन येत असल्याचे पाहून तरुणानं केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य, व्हिडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाला हार्ट अटॅक आला. मात्र आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत या प्रवाशाला रेल्वेच्या डब्यातून बाहेर काढले. प्लॅटफॉर्मवर असलेल्या बेंचवर झोपवून या प्रवाशाला सीपीआर देत त्याचा श्वास मोकळा केला आणि त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. सादिक इस्माईल पटेल असे या रेल्वे प्रवाशाचे नाव आहे. ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान एएसआय अजय महाजन आणि एएसआय एम. पी. सिंह या दोन जवानांनी या प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत.

Solapur RPF Jawan
kalyan News: भाजप- शिंदे गट शिवसेनेबाबत मनसे आमदाराचे मोठे विधान; म्‍हणाले शिवसेनेचाच उमेदवार राहणार

नेहमीप्रमाणे सिद्धेश्वर एक्स्प्रेस सोलापूरवरुन मुंबईकडे रवाना होणार होती. या गाडीच्या जनरल डब्ब्यात प्रचंड गर्दी होती. गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून आरपीएफ जवान अजय महाजन आणि एमपी सिंह हे जवळच थांबून गर्दीवर नियंत्रण आणत होते. याच वेळी रेल्वे प्रवासी सादिक पटेल यांना हार्ट अटॅक आला. त्यांना श्वास घेता येत नव्हते. ही बाब इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वे स्टेशनवर असलेल्या आरपीएफ जवानांना माहिती दिली.

Solapur RPF Jawan
Jalgaon News: चैनपुलींगच्या प्रकरणात एकाच महिन्यात ३ लाखांचा दंड

अजय महाजन आणि एम.पी सिंह यांनी हार्ट अटॅक आलेल्या सादिक पटेल यांना ताबडतोब जनरल डब्ब्यातून बाहेर काढले. त्यानंतर बाकडावर झोपवले आणि छातीवर दाब देत पंपिंग केले. श्वास रोखल्या गेलेल्या सादिक पटेल यांचा काही वेळात श्वास सुरू झाला. काही सेकंदात सादिक पटेल उठून बसले. यामुळे एम.पी.सिंह आणि अजय महाजन यांनी आणि इतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सादिक पटेल यांच्यासोबत त्यांची ११ वर्षीय मुलगी जोया देखील होती.

जय महाजन आणि एम.पी सिंह या आरपीएफ जवानांच्या प्रसंगावधानामुळे सादिक यांचे प्राणा वाचले. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. सध्या सादिक पटेल यांच्यावर सोलापुरातील एका हृदयरोग तज्ज्ञाकडे उपचार व तपासणी सुरू आहे. तर रेल्वेच्या या दोन बहाद्दूर जवानांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.