RPF Officer Death : ट्रेनमधून उतरताना रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, कसारा स्थानकातील दुर्दैवी घटना

RPF Officer Death: कसारा स्थानकात धावत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचा पडून मृत्यू झाला.
Railway Police Officer death at Kasara Railway Station
Railway Police Officer death at Kasara Railway StationSaam Tv
Published On

Railway Police Officer death at Kasara Railway Station: मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकात दुर्दैवी घटना घडली. धावत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचा पडून मृत्यू झाला. दिलीप सोनावणे (वय ५६) असे त्यांचे नाव आहे.

Railway Police Officer death at Kasara Railway Station
Himachal Rains: हिमाचलमध्ये पावसाचा कहर; बस दरीत कोसळली, भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू...

रविवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. धावत्या एक्स्प्रेसमधून खाली पडून रेल्वे पोलीस अधिकारी (RPF) सोनावणे यांचा मृत्यू झाला. ते रात्रपाळीला आले होते. ट्रेनच्या डब्यांमध्ये ते पाहणी करत होते. कसारा रेल्वे स्थानकात एलटीटी कानपूर एक्स्प्रेस थांबली. ते रेल्वे स्थानकात उतरत होते, तोच काही प्रवाशांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यांची सोडवणूक करण्यासाठी ते पुन्हा ट्रेनमध्ये चढले.

प्रवाशांची तक्रार सोडवून ते धावत्या एक्स्प्रेसमधून स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांचा तोल गेला आणि फलाट आणि ट्रेनच्या फूटबोर्डच्या मोकळ्या जागेत पडून ते चाकाखाली सापडले. यात त्यांचा मृत्यू झाला. दिलीप सोनावणे हे कल्याणमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.

Railway Police Officer death at Kasara Railway Station
Kokan Ganpati Festival: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज! एसटीच्या जादा ३१०० एसटी बसेस धावणार

त्यावेळी नेमकं काय घडलं?

सोनावणे यांनी धावत्या ट्रेनमधून कसारा रेल्वे स्थानकात उतरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाय मुरगळला आणि तोल गेला. काही कळण्याच्या आत ते फलाट आणि ट्रेनमधील मोकळ्या जागेतून पडले आणि चाकाखाली सापडले. फलाट आणि ट्रेनच्या फुटबोर्डमध्ये बरेच अंतर आहे. त्यातून ते खाली पडले आणि ही दुर्घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खूपच दुःख झालं. ते सर्वात चांगल्या आरपीएफ अधिकाऱ्यांपैकी एक होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com