
रोहित पवार आणि राम शिंदे (Rohit Pawar-Ram Shinde) हे राजकारणातील कट्टर विरोधक आहेत. रोहित पवार यांनी सलग दोनदा राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील लढतीमुळे कर्जत जामखेड हा मतदारसंघ नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेता विषय असतो. परंतु राजकारणात हे दोघेही कितीही विरोधक असले तरीही खऱ्या आयुष्यात नेहमी एकमेकांच्या भेटी घेत असतात. २०१९ मध्ये पहिल्यांदा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर रोहित पवारांनी राम शिंदेंच्या आईची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा रोहित पवारांनी राम शिंदेंच्या आईचा एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.
राम शिंदेंच्या आईचा व्हिडिओ केला शेअर (Rohit Pawar Share Video Of Ram Shinde Mother)
राम शिंदे यांच्या आई विधानभवनात आपल्या लेकाला भेटायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा हा व्हिडिओ काढण्यात आला होता. हा व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर करत 'प्रा. राम शिंदे साहेब हे माझे राजकीय विरोधक आहेत… पण उच्च पदावर बसलेल्या आपल्या मुलाला भेटायला जेंव्हा त्यांच्या मातोश्री विधीमंडळात आल्या तेंव्हा त्यांचा ऊर नक्कीच अभिमानाने भरुन आला असेल…! आपली संस्कृती-परंपरा जपणारी ही जुनी पिढी आजच्या नवीन पिढीसाठी नक्कीच आदर्शवत आहे. या मातेला माझाही दंडवत!', असं कॅप्शन दिलं आहे.
२०१९ मध्ये विजयानंतरही घेतले होते राम शिंदेंच्या आईचं दर्शन
राजकारणात कितीही विरोधक असले तरीही रोहित पवार नेहमीच विरोधकांच्या कुटुंबियांना मान सन्मान देतात. रोहित पवारांनी राम शिंदेंच्या आईंचे आशीर्वाद घेऊन त्यावेळी वेगळाच आदर्श निर्माण केला होता. २०१९ मध्ये पहिल्यांदाच रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार झाले होते.
याआधी कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांचा वर्चस्व होते. परंतु २०१९ मध्ये राम शिंदे यांचा पहिल्यांदाच पराभव झाला. परंतु अशा परिस्थितीही विजय झाल्यानंतर रोहित पवारांनी राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. रोहित पवारांची ही बाजू सर्वांनाच भावली आहे. रोहित पवार हे राजकीय गोष्टी आणि कौटुंबिक गोष्टी नेहमीच वेगवेगळ्या ठेवतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.