अजितदादांच्या अपघातानंतर VSR चा मालक का पळाला? विदेशात जाण्यासाठी कुणाची मदत?

Rohit Pawar Allegations Against VSR Aviation Explained: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीचा मालक रोहित सिंग परदेशात पळाल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. चौकशीपूर्वीच क्लीनचीट का देण्यात आली, असा सवाल उपस्थित करत निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे.
Rohit Pawar questions the alleged escape of VSR Aviation owner following Ajit Pawar’s plane crash.
Rohit Pawar questions the alleged escape of VSR Aviation owner following Ajit Pawar’s plane crash.Saam Tv
Published On

...हेच ते रोहित पवारांचे गंभीर सवाल....यामुळेच आता पुन्हा अजितदादांचा ज्या विमानाचा अपघात झाला, तीच VSR विमान कंपनी आता संशयाच्या भोवऱ्यात आलीय. 'अपघातामागे असलेल्यांना वाचवलं जातंय का? कंपनी गोत्यात येऊ नये म्हणून कागदपत्रांमध्ये छेडछाड केली जात असल्याच्या गंभीर आरोपानंतर VSR कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय...असा दावा रोहित पवारांनी केला...आणि त्याचे काही पुरावेही त्यांनी देण्याचा प्रयत्न केला...

रोहित पवार यावरच थांबले नाहीत...तर त्यांनी VSR कंपनीवर कारवाई का होत नाही? यावरही भाष्य केलं...आणि सत्तेतील लोक, मंत्री, नेत्यांचे कंपनी मालकाशी कसे संबंध आहेत हेही दाखवण्याचा प्रयत्न केला... यानंतर रोहित पवारांनी थेट लग्नात कोण गेलं होतं...याचीही माहिती देत केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांवर निशाणा साधलाय...कुठलीही चौकशी होण्याआधीच विमान वाहतूक मंत्र्यांनी VSR कंपनीच्या विमान सुरक्षेबाबत विधान करून टाकलं...यावेळी रोहित पवारांनी थेट पुरावाच सादर केला...

चौकशी आधीच VSR कंपनीला क्लीनचीट का?

हा सगळा चौकशीचा भाग आहे...मात्र, अजितदादांचा घातच असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय...मात्र, आता राजकीय वर्तुळातूनही रोहित सिंगला भारतात आणून चौकशी करा अशी मागणी पटोलेंनी केलीय...

तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींनी गंभीर सवाल उपस्थित केलाय...VSR कंपनीला DGCAच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा दावाही त्यांनी केलाय...

या सर्व आरोपांमुळे आता VSR कंपनीची निष्पक्ष चौकशी होणार का...? या कंपनीच्या मालकाला कोणते मंत्री सरसावले आहेत? अजितदादांचा घातपात असेल तर त्यामागे कोण लोक आणि कुणाचं डोकं आहे? याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com