Agriculture News: तापानं फळभाज्या आणि पालेभाज्या फणफणल्या

Vegetable Prices Surge: यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके लागू लागले.राज्यात किमान तापमानात कमालीची वाढ झाली आहे.याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे.
भाजीपाला दर,
भाजीपाला दर,saam tv
Published On

सागर आव्हाड,साम टीव्ही

पुणे: वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे दैनंदिन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत. वाढत्या उन्हामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी देखील घटल्याचे चित्र आहे कडक ऊन असल्याने सरबत आणि रसवंतीगृह गजबजू लागली आहेत. गृहिणींकडूनही लिंबांची खरेदी देखील वाढली आहे.

भाजीपाला दर,
Agriculture News : शेतकऱ्यांचा वेगळा प्रयोग; टरबुजाच्या पिकात केली केळीची लागवड

आवकच्या तुलनेत लिंबांना मागणी वाढल्याने आठवडाभरात लिंबाच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही चढ्या भावाने लिंबाची विक्री होत आहे. दर्जानुसार लिंबाच्या नगाची विक्री ३ ते ७ रुपये भावाने होत आहे.मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सध्या दररोज ८०० ते १००० गोणी लिंबांची आवक होत आहे.

भाजीपाला दर,
Agriculture News : कापूस व सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्य; लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी शेवटची संधी

पुणे येथील फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर

फुलकोबी 20-30 रुपये नग,कोथिंबीर: 20 रुपये जुडी, हिरवी मिरची 80 रुपये किलो,ढेमसे 80 रुपये किलो,कारले 40 रुपये किलो,वांगी 40 रुपये किलो,बटाटे 30 रुपये किलो,चवळी शेंगा 40 रुपये किलो,पत्ताकोबी 40 रुपये किलो,फणस 40 रुपये किलो,भेंडी 40 रुपये किलो, शिमला मिरची 80 रुपये किलो,टोमॅटो 40 रुपये किलो

यंदा लसूण, फ्लावर, कोबी व शेवग्याच्या दरात किंचित घट झाली आहे. मात्र, हिरव्या मिरच्या आणि लिंबाची आवक घटल्याने त्यांचे दर वाढले आहेत.

भाव आणखी वाढण्याची शक्यता

आवक मंदावल्याने आगामी काही दिवसांत भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन हंगामाचा माल बाजारात येईपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com