विरोधी पक्षात असल्यानं विकासकामांना निधी मिळत नसल्याचा सांगत ठाकरेसेनेच्या 6 खासदारांनी शिंदेसेनेत पक्षप्रवेश केला...मात्र स्वत:ला टायगर म्हणवणाऱ्य़ा या खासदारांचा कांगावाच आता दिसून आलाय...कारण समोर आलेली संसदेची अधिकृत आकडेवारी...या आकड्यांनुसार या खासदारांना कोट्यवधींचा निधी मंजूर झालाय... मात्र प्रत्यक्षात त्यातील मोठा भाग खर्चच झालेला नाही... या खासदारांना प्रत्यक्षात किती निधी मिळाला आणि त्यातून त्यांनी किती निधी विकासकामांसाठी खर्च केलाय, पाहूयात...
खासदार संजय जाधव यांना 14 कोटी 7 लाख विकास निधी मिळाला. त्यातील 3 कोटी 78 लाख रुपये खर्च करण्यात आले..मात्र मतदारसंघात 56 प्रस्तावित कामं असताना 25 कामचं संजय जाधवांनी विकास निधीतून पूर्ण केली...
संजय देशमुखांना 18 कोटी 6 लाख रुपयांचा विकास निधी मिळाला... त्यातील फक्त 1 कोटी 42 लाखांची कामं करण्यात आली... म्हणजे मतदारसंघात 106 काम प्रलंबित असताना फक्त 7 कामं खासदार देशमुखांनी मार्गी लावली...
मुंबईचे खासदार संजय दिना पाटलांनाही 14 कोटी 7 लाख रुपयांचा निधी मिळाला... त्यातील 15 लाख रुपये खर्च करण्यात आले असून 40 प्रस्तावित कामांपैकी एकही काम पूर्ण करण्यात आलं नाही...
खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनाही 14 कोटी 7 लाख रुपये विकास निधी मंजुर झाला.. त्यातील 71 लाख निधी वापरण्यात आला असून 135 पैकी फक्त 2 काम पूर्ण झाली आहेत...
नागेश पाटील आष्टीकरांना तब्बल 19 कोटींचा निधी मंजूर झाला...त्यापैकी फक्त 5 कोटी 6 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला...त्यातून 79 पैकी फक्त 28 कामं पूर्ण करण्यात आली...
तर खासदार ओमराजे निंबाळकरांना 18 कोटी 5 लाखांचा निधी मंजुर करण्यात आला...त्यातील 1 कोटी 97 लाख रुपये खर्च करण्यात आले असून 130 पैकी केवळ 21 कामचं पूर्ण करण्यात आली आहेत...
याबाबत या खासदारांना जेव्हा थेट विचारलं तेव्हा त्यांनी, 5 वर्षांची मुदत संपल्यानंतरही निधी शिल्लक राहिला तर तुम्ही मला जाब विचारा, असं विधान ओमराजेंनी केलीय.एवढंच नाही तर मिळणारा निधी अपुरा असल्याचं ओमराजेंनी म्हटलंय. दरम्यान विकास निधीसंदर्भातील आकडेवारी समोर येताच ठाकरेसेनेनं बंडखोर खासदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय...खासदार संजय राऊत यांनी या बंडखोरांवर सडकून टीका केलीय, तर शिंदेसेना आणि भाजपनं मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय....
निधीचे आणि खर्चाचे हे आकडे पाहिले तर विकासकामांसाठी योग्य निधी उपलब्ध होता..आणि असं असेल तर तो खासदारांनी खर्च का केला नाही? की फक्त पक्षांतराचा बहाणा शोधण्यासाठी जनतेची दिशाभूल केली? त्यामुळे निधी अभावी कामं अडकली नव्हती, तर खासदारांच्या इच्छाशक्तीअभावी कामं रखडली होती, हे आता सिद्ध झालंय. त्यामुळे बंडखोरीनंतर तरी हे 6 खासदार आपल्या मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावणार का? हे पाहण महत्त्वाचं असेल...मात्र मतदारांनीही आपल्या मतदारसंघासाठी येणाऱ्या विकास निधीतून काय काम केली जातात यावर लक्ष ठेवून वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडून हिशोब घ्यायला हवा, हे निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.