Badlapur News : बदलापूर रिक्षा चालकांचा बेमुदत संप सुरूच!; संपाची खरी कारणे उघडकीस

बदलापूरमध्ये रिक्षा चालकांचा बेमुदत संप; या कारणांमुळे संप कायम
Badlapur News
Badlapur News अजय दुधाने, बदलापूर

Badlapur News: बदलापूर पालिकेने नागरिकांच्या मागणीनुसार होम प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरूवात केली आहे. यासाठी काल पालिकेने पश्चिमेकडील बाजारपेठेत होम प्लॅटफॉर्मच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक दुकानांवर हतोडा चालवला. यात रिक्षा स्टॅंड देखील पाडण्यात आले. त्यामुळे पश्चिमेकडील रिक्षा चालकांनी यावर नाराजी व्यक्त करत बेमुदत संप पुकारला असून तो आजही कायम आहे. आज दिवस असुन संप कायम आहे. यात चाकरमान्यांचे फार हाल होत आहेत. अशात आता रिक्षा चालकांनी पुकारलेल्या या बेमुदत संपाची अनेक कारणे समोर आली आहेत.

पूर्व सुचना न देता पालिकेची दडपशाही

सदर संपाबाबद रिक्षा चालक मालक वेल्फेअर असोसिएशनचे सचिव सुरेश रोकडे यांनी म्हटले आहे की, कुळगाव बदलापूर नगपरिषदेकडून कोणतीही पूर्व सुचना न देता तोडकाम केले आहे. पुर्वीच्या हुकूमशाही प्रमाणे कारवाई करण्यात आली. अनेक वर्षांपासून बदलापूरमध्ये होम प्लॅटफॉर्मची मागणी सुरू होती. आता ते काम पूर्ण होणार याचा आम्हालाही आनंद आहे. मात्र पालिका यासाठी आम्हाला पर्यायी जागा देणार होती. ती जागा पालिकेने न देताच रिक्षा स्टॅंड पाडले आहे.

Badlapur News
Crime News: मुंबई-गोवा महामार्गावर बंद कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपात असल्याचा संशय

रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

रिक्षा स्टॅंड तोडल्याने चालकांसमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रिक्षा चालकाचे संपूर्ण कुटूंब त्या रिक्षावर चालत असते. मात्र रिक्षा स्टॅंड तोडून पालिकेने आम्हाला रस्त्यावर आणल्याचे मत सुरेश यांनी व्यक्त केले. या बाबत पुढे ते म्हणाले की, १९६५ साली हे रिक्षा स्टॅंड उभारण्यात आले. तेव्हा पासून रिक्षा चालक मालक यावर स्वत:चा उदरनिर्वाह करत आहेत. पालिकेने केलेल्या कारवाई नंतर आम्ही अनेक स्थानिक लोकप्रतीनिधींकडे धाव घेतली मात्र कुणीही दखल घेण्यास तयार नसल्याने आम्ही संप पुकारला असे त्यांनी सांगितले.

Badlapur News
Badlapur News: 'त्या' एका गोष्टीचा राग इतकी वर्षे मनात होता, ९ वर्षांनंतर केला माजी नगरसेवकावर हल्ला

बेरोजगारांचा आधार पालिकेने हिसकावला

सध्या अनेक तरुणांना नोकऱ्या नाहीत. नोकरी नसल्याने अनेकांनी उपसमारीला सामोरे जाण्यासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. रिक्षा चालवून बदलापूर मधील अनेक तरूण मुलं आपला उदनिर्वाह करत आहेत आणि उपासमारीपासून दूर आहेत. मात्र उदनिर्वाहाचे साधनच पालिकेने हिरावून घेतल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे सुरेश रोकडे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com