Re Examination : मोठी बातमी ! 5वी ते 8वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा १५ जूनपूर्वीच!

Re Examination Of Failed Students: यंदा पाचवी ते आठवी इयत्तेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा १५ जूनपूर्वी होणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
Re Examination Of Failed Students
Re Examination Of Failed StudentsYandex

यंदा पाचवी ते आठवी इयत्तेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा १५ जूनपूर्वी होणार आहे. त्यामुळे विषय शिक्षकांना उन्हाळा सुटीमध्येही जादा तास घ्यावे लागणार आहेत. काही शाळांमध्ये लिहायला वाचायला, (Failed Students Of Class V to VIII) विशेष म्हणजे इंग्रजी, आकडेमोड जमत नसलेल्या विद्यार्थ्यांना देखील उत्तीर्ण केल्याची चर्चा आहे. ही बाब पडताळायची कशी? याचं उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुद्धा नसल्याची माहिती सकाळच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

‘आरटीई’ ॲक्ट (RTE Act) शालेय शिक्षण विभागाने लागू करताना पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पास करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. त्यामुळे २०१० पासून आतापर्यंत एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. परंतु यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गुणवत्ता (Re Examination Of Failed Students) ढासाळल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनेकांनी मधूनच शाळा सोडल्याचं समोर आलं आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान विषय विस्तृतपणे समजावेत या हेतूने इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षापासूनसरसकट पास करण्याची पद्धत बंद झाली आहे. शाळांनी घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन केले जाणार (Re Examination Update) आहे. किंवा त्यांचे जादा तास घेऊन पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी फेरपरीक्षा घ्यायची आहे.

शाळांना २ मेपासून उन्हाळा सुटी लागणार आहे. परंतु शिक्षकांना पाचवी ते आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जादा तास घ्यावे लागणार आहेत. त्यांची परीक्षाही सुटीच्याच काळात घ्यावी लागणार (Extra Class In Summer Holidays) आहे. सुटीमध्ये वाढणारे काम टाळण्याच्या हेतूने काही शिक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांना पास केल्याची चर्चा होत आहे. उत्तरपत्रिकांमध्ये विद्यार्थी पास होण्याएवढे गुण घेऊन उत्तीर्ण झालाय, मग त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासायची कशी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे काही शाळांनी अभ्यासात पिछाडीवर असलेल्या विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठपणे गुण दिलेले आहेत.

Re Examination Of Failed Students
Students Refund Exam Fee : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मिळणार परत; बँक खात्यात जमा होणार रक्कम

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेसाठी शाळा स्तरावर घेतलेल्या परीक्षेचे गुण उत्तीर्ण-अनुत्तीर्णसाठी घेता येतील. इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सवलतीचे गुण १० आहेत. एका विषयाला जास्तीत जास्त ५ गुण देता येतील. सवलतीचे गुण तीन विषयांसाठी असणार आहेत. पाचवी आणि आठवीचा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला अतिरिक्त मार्गदर्शनाचे (Class V to VIII Student Exam) वेळापत्रक आणि पुनर्परीक्षेची तारीख निकालाच्या दिवशीच द्यावी. पुनर्परीक्षा पुढील वर्षाची शाळा सुरू होण्यापूर्वी १५ जूनपूर्वीच घ्यावी. पुनर्परीक्षेतही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास तो पुन्हा त्याच वर्गात राहील, असं आवाहन सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून करण्यात आलं आहे.

अभ्यासात खूपच पिछाडीवर असलेल्या पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना वाढीव गुण देऊन पुढील वर्गात ढकलणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे प्रत्येक शाळांनी पारदर्शकपणे गुणदान करणं अपेक्षित आहे. तरी देखील अभ्यासात पिछाडीवर असलेल्या विद्यार्थ्यांस उत्तीर्ण केल्याची तक्रार केल्यास त्याअनुषंगाने पडताळणी केली जाईल, असं कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी सांगितलं आहे.

Re Examination Of Failed Students
SSC Exam : दहावीच्या पेपर दरम्यान परीक्षा केंद्रावर तरुणांचा धुडगूस; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com