Independence Bank: नाशिकच्या इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना RBI कडून रद्द

Nashik Independence Co-operative Bank: बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार 99 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे.
RBI cancels licence of Maharashtra-based Independence Co-operative Bank
RBI cancels licence of Maharashtra-based Independence Co-operative BankNashik Independence Co-operative Bank
Published On

नाशिक: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आज मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील इंडिपेन्डन्स को ऑपरेटिव्ह बँकेचा (Independence Independence Co-operative Bank Limited, Nashik) परवाना (License) रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. त्यामुळे आजपासूनच बँकेचे सर्व व्यवहार बंद झाले आहेत. इंडिपेन्डन्स को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द (Cancelled) करण्याबाबतचा प्रस्ताव सहकार विभागानेही रिझर्व्ह बँकेला (RBI) पाठवला होता. बँकेवर प्रशासक नियुक्त कराण्याचाही प्रस्ताव होता. बँक दिवाळखोरीत निघाली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कामकाजासाठी योग्य ती स्थिती नसल्याचही रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. (RBI cancels licence of Maharashtra-based Independence Co-operative Bank)

हे देखील पहा -

बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 56 सह कलम 11(1) आणि कलम 22 (3) (d) या तरतुदींचे पालन बँकेकडून होताना दिसत नाही. तसेच बँक कलम 22(3) (a), 22 (3) (b), 22(3)(c), 22(3) (d) आणि 22(3)(e) च्या आवश्यकतांचे पालनही झालेले नाही. बँकेचे चालू राहणे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी अनुकुल नाही. सध्याची आर्थिक स्थिती असलेली बँक तिच्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरित परिणाम होईल, असंही रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. "इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक, महाराष्ट्र यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेला 'बँकिंग'चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. कलम 5(b)नुसार ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे समाविष्ट आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 चे 56 तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी होत असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

RBI cancels licence of Maharashtra-based Independence Co-operative Bank
Aurangabad: गौणखनिजांची चोरी रोखण्यासाठी वाळू माफियांवर ड्रोनची नजर

दरम्यान, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून डीआयसीजीसी कायदा, 1961 च्या तरतुदींच्या अधीन राहून बँक दिवाळखोरीत निघेल. त्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला ठेवींची पाच लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंतची ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार 99 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com