Aurangabad: गौणखनिजांची चोरी रोखण्यासाठी वाळू माफियांवर ड्रोनची नजर

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि पैठण परीसरात गोदावरी नदीच्या काठावर मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो.
Aurangabad
Aurangabadअविनाश कानडजे

अविनाश कानडजे

औरंगाबाद - गौणखनिजांची चोरी रोखण्यासाठी आता ड्रोनची नजर असणार आहे. त्यामुळे आता वाळू माफियांचे धाबे दणाणणार हे नक्की. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि पैठण (Paithan) परीसरात गोदावरी नदीच्या काठावर मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. तर, काही भागात मुरूम, मातीसह गौणखनिजाची तस्करी सुरु होती. क्षेत्र मोठं असल्याने बऱ्याच वेळा महसूल पथकाला वाळू आणि गौणखनिज उत्खनन कुठे सुरू आहे याचा अंदाज येत नाही. (Aurangabad Latest News)

हे देखील पहा -

त्यामुळे आता ड्रोनच्या माध्यमातून आशा वाळू आणि गौणखनिज तस्करांवर नजर ठेवली जाणार आहे. बऱ्याचवेळा महसूल किंवा पोलीस पथक कारवाईसाठी आल्याची भनक लागल्याने हे माफिया पळून जातात, तसेच नंतर त्यांची ओळख पटवणे सुद्धा अवघड जाते. मात्र आता थेट ड्रोनच्या माध्यमातून वाळू तस्कर कॅमेऱ्यामध्ये कैद होतील.

Aurangabad
Pune: इमारतीचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी

त्यामुळे पळून गेल्यानंतरही तस्करांची ओळख पटल्याने त्यांच्यावर पुरावांच्या आधारे कारवाई करता येणार आहे. या ड्रोनचा सर्वाधिक फायदा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी होणार आहे. कारण बऱ्याचवेळा पथक कारवाईसाठी आल्याची माहिती लोकेशनवर असलेल्या फंटरकडून माफियांना मिळून जाते. मात्र आता एका जागेवर थांबवून महसूल पथक ड्रोनच्या माध्यमातून अनेक भागावर लक्ष ठेवणार असल्याने वाळू माफिया आणि गौनखनिज चोरणाऱ्यांचे थाबे दणाणले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com