Ravindra Chavan: भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड

Ravindra Chavan BJP working State President : भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली.
Ravindra Chavan
Ravindra Chavan BJP working State President saam
Published On

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केलीय. रवींद्र चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतील. याबाबत भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. आधीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळलेल्या रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळाले नाहीये. त्यामुळे चव्हाण काहीसे नाराज होते.

चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदाी दिली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आज चव्हाण यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली असून त्यांची नियुक्ती कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अजूनही चंद्रशेखर बावनकुळे असून त्यांनी प्रदेशाध्यक्षपद अद्याप सोडलेले नाहीये. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देतो. सर्वांनी मला कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. हा माझा सन्मान असून कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा हा पक्ष असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणालेत.

Ravindra Chavan
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची दोस्ती होणार? मविआ सोडणार, ठाकरे महायुतीत जाणार?

कोण आहेत नवे कार्यकारी पक्ष अध्यक्ष

रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २००९ पासून सलग ४ वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवलाय. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवलं होतं. चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Ravindra Chavan
BJP News : भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित? मोठी अपडेट आली समोर, पाहा Video

रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने २००२ साली कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. २००५ साली त्यांनी काँग्रेसच्या उमेदावाराचा पराभव करत कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक झाले होते. २००७ मध्ये ते स्थायी समिती सभापती झाले. २००९साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवलं होतं. २०१६ साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com