Maharashtra Politics: रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं विरोधकांची कोंडी, शिंदेसेनेविरोधात चव्हाणांची रणनीती काय?

Ravindra Chavan challenges Shinde Sena: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी शांततेत विरोधकांची कोंडी करायला सुरुवात केलीय.. मात्र चव्हाणांनी शिंदेसेनेला कसं बेजार केलंय आणि चव्हाणांच्या नेतृत्वाचा कसा कस लागलाय..
Ravindra Chavan strategizes as Shinde Sena leaders feel political pressure ahead of municipal elections.
Ravindra Chavan strategizes as Shinde Sena leaders feel political pressure ahead of municipal elections.Saam Tv
Published On

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी गाजतेय.. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी शांततेत विरोधकांना घाम फोडलाय.. रवींद्र चव्हाणांनी फक्त विरोधी पक्षच नाही तर शिंदेसेनेला खिंडार पाडून शिंदेंची कोंडी केलीय..

अपूर्व हिरेंना भाजप प्रवेश देऊन दादा भुसेंची कोंडी

राजू शिंदेंना पक्षात घेत संजय शिरसाट यांना शह

सत्यजीत पाटणकरांना पक्षप्रवेश देऊन शंभुराज देसाईंचं टेन्शन वाढवलं

कैलास गोरंट्याल यांना पक्षात घेत अर्जून खोतकरांपुढे आव्हान उभं केलं

डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंच्या निकटवर्तीय अनमोल म्हात्रेंचा भाजपात प्रवेश

रवींद्र चव्हाणांनी थेट शिंदेसेनेच्या मंत्र्यांपुढे आव्हान उभं करायला सुरुवात केल्यानं एकनाथ शिंदेंनी जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला... अंबरनाथ, बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपच्या नेत्यांना गळाला लावायला सुरुवात केली.. मात्र रवींद्र चव्हाणांच्या वेगापुढं शिंदेंची चांगलीच दमछाक झाली.. अखेर अस्वस्थ शिंदेंनी अमित शाहांच्या दरबारात धाव घेत चव्हाणांची तक्रार केली.. मात्र शाहांनी शिंदेंची तक्रार बेदखल करत चव्हाणांना अभय दिलं... त्यामुळे शिंदे विरुद्ध चव्हाण संघर्ष आणखीच पेटला... दरम्यान रवींद्र चव्हाणांची नियुक्तीच शिंदेसेना फोडण्यासाठी केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय...

एका बाजूला चव्हाणांना दिल्लीतून अभय मिळाल्यानं शिंदेंची पुरती कोंडी झाली..त्यामुळे दुसरीकडे रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी निलेश राणे मैदानात उतरले आणि निलेश राणेंच्या आडून शिंदे विरुद्ध चव्हाण वादाचा नवा अंक सुरु झालाय..एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंकडून तिजोरी आणि निधीबाबत वक्तव्य केलं जात असताना रवींद्र चव्हाणांनी एक नंबरला महत्व असतं...बाकी 2 नंबरला नाही म्हणत उत्तर दिलं... त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत नेते, पदाधिकाऱ्यांना गळाला लावून विरोधकांना जेरीस आणलेल्या रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाचा महापालिका निवडणुकीत कस लागणार हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com