Ravikant Tupkar : अकाेला कारागृहात रविकांत तुपकरांची प्रकृती ढासळली, आंदाेलन यशाच्या टप्प्यावर

दुसरीकडे सरकारने या आंदोलनाचा धसका घेत शेतकऱ्याच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.
Ravikant Tupkar, Akola
Ravikant Tupkar, Akolasaam tv
Published On: 

Ravikant Tupkar Latest News : अकाेला (akola) कारागृहात न्यायालयीन काेठडीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkar sanghatana) संघटक रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केल्याने त्यांची तब्येत ढासळली आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान तुपकर यांच्या आत्मदहन आंदाेलानानंतर (aandolan) सरकारने शेतक-यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा करण्यास प्रारंभ केला आहे.

Ravikant Tupkar, Akola
Gajanan Maharaj Prakatdin : 'गण गण गणात बोते' जयघाेषाने शेगाव नगरी दुमदुमली; लाखाे भाविक दर्शन रांगेत

शेतकऱ्यांना (farmers) पिक विम्याची रक्कम पूर्ण मिळावी तसेच अतिवृष्टीची रक्कम मिळावी यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकरांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाेलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांकडून शेतकऱ्यांवर बेसुमार लाठीचार्ज करण्यात आला. यात असंख्य शेतकरी जखमी झाले. रविकांत तुपकर व त्यांच्यासमवेत 25 शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्वांना न्यायाल्यात हजर करण्यात आले. न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Ravikant Tupkar, Akola
Swabhimani Shetkari Sanghatana : रविकांत तुपकरांच्या अटकेनंतर 'स्वाभिमानी' आक्रमक,'आता महाराष्ट्र पेटून उठेल'

रविकांत तुपकर यांनी न्यायालयीन कोठडीत अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदाेलनाचा चाैथा दिवस आहे. आजही अकोला कारागृहात त्यांचे अन्न त्याग आंदोलन सुरूच आहे. दरम्यान यामुळे तुपकारांची तब्येत ढासळली आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

दुसरीकडे सरकारने या आंदोलनाचा धसका घेत शेतकऱ्याच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो रुपये जमा होत आहेत. तुपकर जरी कारागृहात असले तरी शेतकऱ्यांना इकडे आर्थिक लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आंदाेलनाला यश आल्याची चर्चा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.