Ratnagiri News : महिनाभरापूर्वीच लग्न, आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन मोडलं, तरुणाचा अपघाती मृत्यू; नवविवाहितेचा आक्रोश

Ratnagiri Accident News : रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Ratnagiri Nakhare Accident News
Ratnagiri Nakhare Accident NewsSaam Tv News
Published On

अमोल कलई, साम टीव्ही

रत्नागिरी : राज्यात अपघाताचं प्रमाण सतत वाढत जात आहे. असाच एक भीषण अपघात काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत झाला होता. चार दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील ४८ वर्षीय युवकाच्या बाईक अपघाताची घटना ताजी असतानाच आता नाखरे येथील एका तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असं मृत तरुणाचं नाव आहे. पावस येथून नाखरे येथील आपल्या घरी परत जाताना त्याचा अपघातात मृत्यू झाला, हृदयद्रावक बाब म्हणजे या तरुणाचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. नेहमी हसतमुख चेहरा असलेला तसेच आंबा बागायत शेतकरी असलेल्या तरुणाची अकाली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मयत तरुणाचं नाव चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असं असून, तो नाखरे येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रवदन हा पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून परतत असताना हा अपघात घडला. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची एका कारशी जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झाला.

Ratnagiri Nakhare Accident News
Beed Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी अपडेट! स्कार्पिओ वाहनाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर, 'ते' ठसे नेमके कुणाचे?

चंद्रवदन हा एक अष्टपैलू तरुण होता. त्याला ट्रेकिंगची आवड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यवसायिक म्हणूनही ओळखला जात होता. त्याने कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्याचं नुकतंच एक महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते, लग्नाची हळदही अजून सुकली नव्हती चंद्रवदन आणि सगळं कुटुंब आनंदात असतानाच निष्ठूर नियतीने डाव साधला. यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Ratnagiri Nakhare Accident News
Uddhav Thackeray : नको तिथे मुख्यमंत्रिपदाचे कोंब फुटलेत ते छळतात...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com