रत्नागिरी - जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर, शिवसेना नेते नामदार उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पँनलने वर्चस्व निर्माण केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या पँनलचा सुपडा साफ झाला आहे. एकुण २१ जागांपैकी १८ जागांवर उदय सामंत आणि तानाजी चौरगे समर्थक निवडून आले आहेत. तर निलेश राणे यांच्या समर्थकांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं.
हे देखील पहा -
त्यामुळे कोकणातील आणखी एका प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांना दारूण पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे अवघ्या कोकणाचे लक्ष लागलं होते. त्यांचे निकाल आज घोषित करण्यात आले आहेत. २१ पैकी १८ जागांवर विजय मिळवत सहकार बॅनलने आपले वर्चस्व निर्माण केले आहे हे स्पष्ट झाले आहे. सहकार पॅनलचे गजानन पाटील यांनी रत्नागिरीत विजय मिळवला आहे. तर गुहागरमधील सहकार पॅनलचे डॉ. अनिल जोशी यांनी विजय मिळवला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.