Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाडांनी कौतुक केलेल्या रॅपरला अटक, ट्विट करत व्यक्त केला संताप; काय आहे प्रकरण?

Viral Rap Song On Maharashtra Politics: सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
Jitendra Awhad Mungase
Jitendra Awhad MungaseSaamtv
Published On

Rapper Raj Mungase Areest: राज्यात सत्तांतर झाल्यापासून ५० खोक्यांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या सत्तानाट्यावर आधारित एक रॅप सॉंगही तयार करण्यात आले होते. राज मुंगासे असे या रॅपरचे नाव असून या गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता.

सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विटमध्ये आव्हाडांनी या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील सत्तानाट्यावर (Maharashtra Politics) आधारित एक रॅप सॉंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. रॅपर राज मुंगासे (Raj Mungase) याचे चोर आले, चोर आले, पन्नास खोके घेवून चोर आले अशा आशयाचे हे रॅप तयार केले होते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या रॅपसॉंगवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या. खुद्द राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनीही या तरुणाचे कौतुक केले होते.

या ट्विटमध्ये आव्हाडांनी राम मुंगासे या तरुणाला अटक करु नका, असे म्हटले होते. परंतु आता या तरुणाला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक करत त्याला अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.

Jitendra Awhad Mungase
Bribe Trap: कार्यकारी अभियंत्यास १ लाखांची लाच स्विकारताना अटक; घरात सापडली साडेसहा लाखाची रोकड

काय आहे जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट...

"राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं, असे या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हणले आहे.

आम्ही सगळे पाठीशी...

तसेच "50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसते. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही," असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com