Jalna Lok Sabha: मनोमिलन झालं, मतभेद मिटले! रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी अर्जून खोतकर उतरले मैदानात

Raosaheb Danve Jalna News: अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात मनोमिलन झाल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद देखील संपुष्टात आल्याचं बोललं जातंय.
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna News
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna News Saam TV

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna News

जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज पुन्हा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. दर्शना निवास्थानी झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी खोतकर आणि दानवे यांच्यात मनोमिलन झाल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद देखील संपुष्टात आल्याचं बोललं जातंय.

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna News
Baramati News: २०१४ मध्ये आपण थोडक्यात वाचलो, जानकर कमळावर लढले असते, तर सुफडा साफ झाला असता, अजित पवारांचं विधान

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. खोतकर स्वतः ला दानवे यांच्या प्रचारापासून दूर ठेवत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचं चांगलंच टेन्शन वाढलं होतं.

दोन्ही नेत्यांचे पक्ष महायुतीत असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हा वाद मिटवावा, अशी इच्छा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची होती. अखेर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दर्शना निवास्थान गाठत खोतकर यांची भेट घेतली. तसेच त्यांची मनधरणी देखील केली.

दरम्यान, खोतकर यांनी देखील जुना वाद विसरून दानवे यांचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं आहे. आजपासून खोतकर रावसाहेब दानवेंच्या प्रचारार्थ मतदारसंघ (Jalna Lok Sabha) पिंजून काढणार आहेत. दोन्ही नेते आज जालन्यातील गोलापांगरी याठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.

रावसाहेब दानवे यांना भाजपने सलग सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने कल्याण काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. कल्याण काळे यांचा जालना मतदारसंघात तगडा जनसंपर्क आहे. त्यांनी २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंना चांगलीच फाईट दिली होती. पण ऐनवेळी दानवेंनी चकवा देत निवडणुकीत विजय मिळवला होता.

Edited by - Satish Daud Patil

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna News
Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com