Baramati News: २०१४ मध्ये आपण थोडक्यात वाचलो, जानकर कमळावर लढले असते, तर सुफडा साफ झाला असता, अजित पवारांचं विधान

Baramati Lok Sabha Election 2024: २०१४ साली महादेव जानकर यांनी जर बारामतीतून कमळ चिन्हावर निवडणूक लढवली असती, तर आपला सुपडा साफ झालेला असता, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
Baramati Lok Sabha Election 2024
Baramati Lok Sabha Election 2024Saam TV
Published On

Ajit Pawar on Mahadev Jankar

"२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण थोडक्यात वाचलो. महादेव जानकर यांनी जर त्यावेळी बारामतीतून कमळ चिन्हावर निवडणूक लढवली असती, तर आपला सुपडा साफ झालेला असता", असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते बारामती लोकसभा मतदारसंघातील डोरलेवाडी येथील प्रचारसभेत बोलत होते.

Baramati Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यंदा संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. कारण, बारामतीत पहिल्यांदाच शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार असा थेट सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीने बारामतीतून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यांच्या विरोधात महायुतीने सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. सध्या शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. अशातच अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना एक मोठं विधान केलं आहे.

अजित पवार म्हणाले, "मला खडकवासलातील लोकांनी सांगितलं, दादा महादेव जानकर यांनी २०१४ च्या निवडणुकीत कमळ चिन्ह घेतलं असतं तर, सुपडा साफ झाला असता. कारण, खडकवासल्यामधील मतदारांना कपबशी हे जानकर यांचं चिन्ह आहे, हे माहिती नव्हतं"

"मात्र, यावेळी मतदारांच्या सर्व माहित असून त्यांनी जानकर यांचं शिट्टी चिन्ह लक्षात ठेवलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी परभणीत आल्यावर जानकर यांचा हात धरून आपला छोटा भाऊ आहे असं म्हटलं. त्यामुळे जनतेला शिट्टीला मत म्हणजे कमळाला मत असं लक्षात आले", असंही अजित पवार म्हणाले.

२०१४ निवडणुकीत बारामतीत काय झालं होतं?

बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपने २०१४ साली सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महादेव जानकर यांना उमेदवारी दिली होती. पण जानकर यांना कमळ चिन्ह नाकारलं. त्यांनी कपबशी चिन्हावर निवडणूक लढवली. त्यावेळी जानकर यांना सुप्रिया सुळे यांना चांगलीच लढत दिली होती.

पण अखेरीस त्यांचा ७० हजार मतांनी पराभव झाला. महादेव जानकर यांनी ही निवडणूक कमळ चिन्हावर लढली असती, तर त्यांचा नक्कीच विजय झाला असता, असं अनेकांचं म्हणणं होतं. याच गोष्टीचा पुर्नउच्चार अजित पवार यांनी देखील केला आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Baramati Lok Sabha Election 2024
Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com