Raksha Khadse: माझ्या आडनावामुळे मला डावललं...; लोकसभा निवडणुकीवरून रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य

Marathi Political News: त्यांचे विचार वेगळे असल्याने ते त्या पक्षात आहेत आणि माझे विचार वेगळे असल्याने मी या पक्षात आहे.
Raksha Khadse
Raksha KhadseSaam TV
Published On

Raksha Khadse News:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागलेत. अशात रावेर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे अद्यापही भाजपात आहेत. अशात आता निवडणुकीच्या तोंडावर त्या पक्षांतर करतील अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांवरून रक्षा यांनी नाराजी व्यक्त करत मोठं विधान केलंय.

Raksha Khadse
NCP Political News : बारामतीत सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार? वारजे भागातील बॅनरमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

पत्रकारांशी संवाद साधताना रक्षा खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "आम्ही एकाच कुटुंबातील असलो तरी आमचे विचार वेगळे आहेत. त्यांचे विचार वेगळे असल्याने ते त्या पक्षात आहेत आणि माझे विचार वेगळे असल्याने मी या पक्षात आहे. मात्र खडसे अडनाव माझ्या पाठी असल्याने मला डावललं जात असेल तर हे चुकीचं आहे."

फक्त एकनाथ खडसेंची सून म्हणून ओळख ठेवलेली नाही...

सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी पुढे म्हटलं की, " मी एकनाथ खडसेंची सून आहे फक्त यामुळे मी मोठी झालेले नाही. मी स्वत:ची ओळख माझ्या कामातून निर्माण केलीये. माझ्यावर आरोप केला जातोय की मी पक्षांतर करणार. पण मी ठामपणे सांगते की, माझे आणि त्यांचे विचार वेगळे आहेत. माझा पक्ष वेगळा आहे आणि मी भाजपमध्येच आहे." असं रक्षा खडसेंनी म्हटलं.

"मी कोणत्या पक्षात जावं आणि कोणत्या नाही यावरून माझ्यावर कोणीही दबाव आनू शकत नाही. एकनाथ खडसेंचे विचार सध्या भाजपशी जुळत नाहीत. मात्र माझे विचार जुळतात. त्यामुळेच मी भाजपची खासदार आहे. "

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आहेत. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आहेत त्यामुळे रक्षा खडसे देखील यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चांवर रक्षा यांनी अशा शब्दांत आपलं मत व्यक्त केलंय.

Raksha Khadse
Political News: ५ राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक मैदानात; महाराष्ट्रातल्या दोन दिग्गजांचा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com