Raigad News: राज्यकर्त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम बेगडे : राजू शेट्टी; शेतकरी जागृती अभियानास प्रारंभ

Raju Shetti News : 'स्वाभिमानी' 30 सप्टेंबर नंतर राज्यामध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता.
raigad, raju shetti, swabhimani shetkari sanghatana
raigad, raju shetti, swabhimani shetkari sanghatanasaam tv
Published On

- सचिन कदम

swabhimani shetkari sanghatana news : कृषी दिनाचे औचित्य साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छ्त्रपती शिवाजी महाराज जनजागृती अभियानाची (swabhimani shetkari sanghatana shetkari jan jagruti abhiyan) सुरुवात किल्ले रायगड (Raigad) वरून आज (शनिवार) केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी व शेकडो शेतकरी किल्ले रायगडावर आले हाेते. यावेळी शेट्टींनी साम टीव्हीशी बाेलताना राज्यकर्त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्यावरील बेगडी प्रेम असल्याचे म्हटलं. (Maharashtra News)

raigad, raju shetti, swabhimani shetkari sanghatana
Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले, शहापूरच्या 'त्या' समस्येवर उपाययाेजनेस प्रारंभ

किल्ले रायगडावर (raigad) राजसदर, होळीचा माळ तसेच समाधी स्थळावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, शेतकऱ्यांसाठीची निती याची उदाहरण देत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. राजू शेट्टी म्हणाले राज्यकर्त्यांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम बेगडे असल्याचे दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही असेही शेट्टींनी नमूद केले.

raigad, raju shetti, swabhimani shetkari sanghatana
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेनंतर अजित पवार भावविवश, आतातरी...

शेतकरी ज्या वेळेला संकटात उभा होता तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खऱ्या अर्थाने शेतक-यांना उभ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पहिली कर्जमाफी , दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना बी -बियाणे ,अनुदान देणे. गोदामाची कोठारी उभा करणे बैल जोडी , बंधारे , विहीरी , शेती साहित्य यासारख्या वस्तू मोफत वाटणे यामाध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.

raigad, raju shetti, swabhimani shetkari sanghatana
Raigad News : पावसाचा जाेर वाढला... वरंध घाटात 'या' वाहनांना 30 सप्टेंबरपर्यंत बंदी

संपूर्ण राज्यात सर्व पिकांचा उत्पादन खर्च ,मिळणारा भाव व वाढलेल्या महागाईमुळे शेती उत्पादनावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींची शिवारापासून ते गावातील वाडी वस्तीपर्यंत सभा बैठका घेऊन अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे असेही शेट्टींनी यांनी रायगड येथे साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com