Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election : 'मर्दा सारखे लढा, रडीचा डाव काय खेळता'; नेमके काय घडले सतेज पाटलांबाबत आज काेल्हापूरात

या निर्णयाविराेधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची घाेषणा आमदार सतेज पाटील यांनी केली.
Satej Patil , Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election,
Satej Patil , Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election, saam tv

- रणजित माजगावकर

Kolhapur News : कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election) आमदार सतेज पाटील (Mla Satej Patil) गटाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीच्या अर्ज छाननीत आमदार पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. (Breaking Marathi News)

Satej Patil , Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election,
Cancelled Trains List : महाराष्ट्र एक्सप्रेससह १२ गाड्या रद्द; जाणून घ्या कारण

त्यांच्यावर नियमानुसार ऊस न घातल्याचा ठेवला ठपका ठेवण्यात आलेला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय सतेज पाटील यांनी घेतला आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असा इशारा देखील त्यांनी विराेधकांना दिला.

आजचा दिवस काळा असल्याचं सतेज पाटील यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेऊन या बैठकीत सतेज पाटील यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. सर्व गटात आमच्या परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आहेत.

कोणताही गट बिनविरोध होणार नाही. चांगला कारभार केला तर रडीचा डाव का खेळता ? कुस्ती करायची होती मग पळपुटेपणा का करता ? असे म्हणत आजच्या निर्णायास उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचा इशारा सतेज पाटील यांनी विराेधकांना दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com