ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी रेडी, शिंदे-फडणवीस नेमकं काय करणार?
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीत खळबळ.
महायुतीकडून बीएमसी निवडणुकांसाठी 'नो रिक्स' धोरण राबवले जात आहे.
गणेशोत्सव आणि दहीहंडी काळात मतदारांशी थेट संपर्क वाढवण्याचा प्लान.
ठाकरे कुटुंबाच्या कारभारावर थेट हल्ल्याची तयारी.
Thackeray Brothers’ Reunion Triggers Mahayuti’s Plan B : दोन दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन झाले. त्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीचे टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर काय करायचं? याचा प्लॅन महायुतीकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांत राज आणि उद्धव ठाकरे अनेकदा एकत्र आले. ५ जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्यात भाऊ एकत्र आले, तर २७ जुलै रोजी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र आले तर काय करायचं? याचे प्लॅनिंग महायुतीकडून करण्यात आले आहे.
ठाकरे बंधू एकत्र आले तर मतांचं विभाजन टाळण्यासाठी महायुतीनं प्लॅन बी तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईसह प्रमुख महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला जाईल. मुंबई पालिकेतील गेल्या अनेक वर्षांपासूनचा ठाकरे कुटुंबाचा कारभार उघड करण्याचाही महायुतीचा मानस आहे. त्याशिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गणेशोत्सव काळात मोफत ट्रेन्स आणि एसटी बसेस सोडण्याचा विचार आहे. गोविंदा पथकं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महायुतीशी जोडण्याचाही प्रयत्न होणार आहे. प्रत्येक वॉर्डची जबाबदारी आमदारांकडे देत सणासुदीच्या काळात जनतेपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली जात आहे.
नो रिक्स धोरण काय आहे ?
ठाकरे बंधू एकत्र आल्यास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून नो रिक्स धोरण अवलंबले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. प्रमुख महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा विचार करण्यात येत आहे. मतांचं विभाजन होणार नाही याची काळजी महायुती घेणार आहे. ठाकरेंना फायदा होऊ नये यासाठी मुंबईसह प्रमुख महानगर पालिका महायुती एकत्र लढणार आहेत.
मुंबईची माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे निवडणुकीची जबाबदारी देऊ शकतात. ज्या ठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करतील. मुंबई पालिकेवर गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या कारभाराची महायुती पोलखोल करेल. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतील्या आमदारांकडे देण्यात येणार.
गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात मोफत ट्रेन, एसटी सेवा तसेच सार्वजनिक मंडळांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे. तर, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाद मिटवून एकत्र प्रचार मोहिमेची तयारी महायुती करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.