Politics Maharashtra : राज ठाकरेंची स्क्रिप्ट 'सागर'वरुन? हिंदीसक्तीचा मुद्दा, राऊतांचा राज ठाकरेंना गुद्दा?

Raj Thackeray Sanjay Raut clash News : राज ठाकरे विरुद्ध संजय राऊत — हिंदी सक्तीवरून राजकीय घमासान! मुंबईत मराठी लोकसंख्येतील घट आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाषिक राजकारण चिघळलं आहे.
Raj Thackeray Sanjay Raut clash News
Raj Thackeray Sanjay Raut clash News
Published On

Raj Thackeray Sanjay Raut clash : हिंदी सक्ती वरुन राज ठाकरे विरुद्ध संजय राऊतांमध्येच सामना रंगलाय... मात्र अचानक हिंदी सक्तीमागचं खरं कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

राज्य सरकारच्या हिंदी सक्तीचा निर्णय खपवून घेणार नाही, अशी थेट भूमिका राज ठाकरेंनी घेतलीय... यावेळी राज ठाकरेंनी ट्वीट करुन सरकारला घेरलंय... मात्र एवढं मोठं ट्वीट तातडीने आल्याने संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय.. ही स्क्रिप्टच सागर वरुन आल्याचा खोचक टोला राऊतांनी लगावलाय. त्याला मनसेनंही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय..

एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना इंग्रजी येत नसल्यानेच हिंदी भाषा लादली जात असल्याचा टोला लगावलाय.. भाषिक मतांचं समीकरण मांडून आगामी पालिका निवडणुकां पार्श्वभुमीवर सरकारने हा निर्णय घेतला असावा का असा सवाल उपस्थित होतोय. त्याला कारण मुंबईतली मराठी भाषिकांची कमी होत चाललेली संख्या..पाहूया काय आहे ही आकडेवारी....

Raj Thackeray Sanjay Raut clash News
Raj Thackeray: 'मराठी बोलना नही आणता', तर कानाखाली बसणार; राज ठाकरे कडाडले

मुंबईत मराठी लोकसंख्या किती?

- 2023 च्या आकडेवारीनुसार

- मुंबईत मराठी लोकसंख्येत 10 टक्क्यांची घट

- वर्ष 2011च्या जनगणनेमध्येच मराठी भाषिकांची संख्या 2.64 टक्क्यांनी घटली

- यूपी, बिहारींची संख्येत लाखांमध्ये वाढ

- तोच 2011 च्या जनगणनेनुसार हिंदी भाषिकांचा टक्का थेट 40 टक्क्यांनी वाढला

Raj Thackeray Sanjay Raut clash News
Maharashtra Politics: महायुतीची नवी खेळी राज-शिंदे युती? ठाकरे-शिंदे एकत्र येणार? शिंदेंनाही हवा ठाकरे ब्रँड?|VIDEO

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 84, भाजपला 82 तर काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9 तर मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या.. गेल्या ८ वर्षात पुलाखालून बरच पाणी वाहून गेलय. आता बदललेल्या परिस्थितीत भाषिक धृवीकरण भाजपच्या पथ्यावर पडणार की शिवसेनेच्या ? आणि हिंदी सक्ती मराठी मुंबईकर स्वीकरणार का? याकडे लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com