Maharashtra Politics: महायुतीची नवी खेळी राज-शिंदे युती? ठाकरे-शिंदे एकत्र येणार? शिंदेंनाही हवा ठाकरे ब्रँड?|VIDEO

Raj Thackeray-Eknath Shinde Alliance in the Works? विधानसभा निवडणुकीत टोकाचं वितुष्ट निर्माण झालं.. त्यानंतरही शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनाला गेले.. मात्र ही एकत्र येण्याची नांदी आहे का? एकनाथ शिंदेंनी युतीबाबत नेमके काय संकेत दिलेत? आणि कोणत्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची युती होऊ शकते? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
politics
politics saam tv
Published On

अमित ठाकरेंसमोर उमेदवार देऊन राज ठाकरेंची कोंडी करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शिवतीर्थवर स्नेहभोजनासाठी हजेरी लावली आणि तब्बल दीड तास चर्चा केली.. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. मात्र ही भेट वैयक्तिक असल्याचं स्पष्टीकरण मनसे आणि शिंदे गटाकडून देण्यात आलंय...

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता... मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती शिंदेंना मदत करण्याची आशा असतानाच शिंदेंनी थेट अमित ठाकरेंसमोरच उमेदवार दिला... त्यामुळे राज ठाकरेंची कोंडी झाली आणि अमित ठाकरेंचा पराभव झाला... त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंमधील संबंध चांगलेच ताणले गेले होते.. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चांना वेग आला. नेमकं हेच टायमिंग साधत शिंदेंनी डाव टाकलाय.. मात्र या भेटीमागची कारणं काय आहेत? पाहूयात....

politics
Ranjit kasle : करुणा मुंडे, अक्षय शिंदे एन्काऊंटर आणि जीवे मारण्याच्या धमक्या; निलंबीत PSI रणजीत कासलेंचा नवा व्हिडिओ समोर

विधानसभेत आलेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न

मुंबईत मराठी मतांवर मनसेचा प्रभाव

BMC जिंकण्यासाठी सेना-मनसे एकत्र येणार

उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी मुंबई आणि ठाण्यात मदत होणार

राज-शिंदेंमध्ये हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार हा महत्वाचा धागा

महायुतीत वजन वाढवण्यासाठी शिंदेंकडून मोर्चेबांधणी

politics
Ahilya Nagar : दोन बहिणी पोहायला पाण्यात उतरल्या, वर आल्याच नाहीत, वाचवायला गेलेला तरूणही बुडाला, कर्जतमधील दुर्दैवी घटना

विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ठाकरे गटाची धुळधाण उडाली... मात्र मुंबईत 20 पैकी 10 जागा जिंकण्यात यश मिळालं.. त्यामुळे मुंबईवर ठाकरेंचा प्रभाव कायम असल्याचं स्पष्ट झालंय. तर मनसेलाही विधानसभा निवडणुकीत मुंबईत 10 लाख मतं मिळाली आहेत...त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हे बेरजेचं राजकारण सुरु आहे.. मात्र राज ठाकरे शिंदेंचा प्रस्ताव स्वीकारुन महायुतीत सहभागी होणार की एकला चलो चा नारा बुलंद करणार? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com