युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Will Raj Thackeray join hands with Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता यांच्या युतीच्या चर्चां सुरु असतांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना साद घातलीये. परंतू राज ठाकरेंच्या मौनानं अनेक सवाल उपस्थित होतायेत. पाहूया या रिपोर्टमध्ये..
Uddhav and Raj Thackeray on one stage after 20 years, reviving hopes of a political reunion in Maharashtra.
Uddhav and Raj Thackeray on one stage after 20 years, reviving hopes of a political reunion in Maharashtra.Saam Tv
Published On

5 जुलैला मराठीचा विजयोत्सव करत ठाकरे बंधू २० वर्षांनी एका व्यासपीठावर आले. ना कोणता झेंडा, फक्त मराठीचा अंजेडा म्हणत ठाकरेंनी ते अवघ्या राज्यातील मराठी प्रेमीचं मन जिंकलं. मात्र ठाकरे बंधू एका व्यासपीठावर येऊन 8 दिवस झाले परंतू हे दोघं पुन्हा एकदिलानं एकत्र येऊन राजकारण करणार का यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण ८ दिवस होऊनही दोन्ही पक्षांमध्ये शुकशुकाट दिसतोय.. मात्र आता ठाकरे सेनेनं आपलं मुखपत्र सामना मधून 20 वर्षांपासून दुरावलेल्या आपल्या भावाला थेट युतीची साद घातलीये.

रोखठोक मध्ये काय म्हटलंय. पाहूया..

हिदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही

ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल

मराठी एकजुटीचे वादळ पाहून दिल्ली आणि राज्यातील सत्ताधारी हादरलेत

ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील

शाह आण शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील

राज आणि उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत

शिंदेंचे मंत्री ही विधाने कशाच्या बळावर करतात?

ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना आज हाक दिलीये. परंतू राज ठाकरेंची भूमिका काही स्पष्ट होत नाही. कारण मेळाव्यानंतर सर्वत्र युतीची चर्चा रंगलेली असतांना राज ठाकरेंनी अवघ्या २ दिवसातच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश देत कुठलंही भाष्य माझी परवानगी घेतल्याशिवाय करायचं नाही असं म्हणत युतीचा निर्णय पुर्णपणे राखून ठेवलाय. (राज ठाकरेंचं ट्विट लावा) त्यामुळे राज ठाकरे हे सध्या वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जातंय.. तर ठाकरे सेनेनं मात्र युतीबाबत मोठा आशावाद व्यक्त केलाय...

उद्धव ठाकरेंनी कुठलीही गुंतागुत न ठेवता वारंवार युतीसाठी हात पुढे करुन मराठी मतदारांच्या मनात युतीच्या आशा पल्लवित केल्यायेत. तर राज ठाकरे सध्या मौनात असून ते मतदारांचा कल, आगामी निवडणुकांची गणितं आणि स्वत:ची राजकीय स्वतंत्र ओळख या पैलूवर विचार करत राजकीय समीकरणांची आखणी करतायेत का असाही प्रश्नयं. परंतू परंतू ठाकरे बंधूची युती झाली तर ही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल इतकं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com