Raj Thackeray: मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही? राज ठाकरेंनी थेट सांगूनच टाकलं

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. लोकसभेासाठी मनसे राज्यातील महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय.
Raj Thackeray
Raj Thackeray Saam tv

(अभिजीत देशमुख)

Raj Thackeray In Dombivali :

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावरून भाष्य केलंय. महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. विधानभवनात एका कार्यक्रमाला गेलो होतो, कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नसल्याचं राज ठाकरे म्हणालेत. त्याचबरोबर त्यांनी महायुतीत जाण्याच्या चर्चांवरही भाष्य केलंय.(Latest News)

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी करू लागलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) देखील यावेळी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उतरणार आहे. लोकसभेासाठी मनसे राज्यातील महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र या फक्त चर्चा आहेत, त्याला कोणतंच तथ्यचं नसल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. व्यासपीठावर दिसण्याने आघाडी घडत किंवा ठरत नसतात,असं म्हणत महायुतीत समावेश होण्याच्या चर्चांना राज ठाकरेंनी पडदा टाकलाय.

आगामी निवडणुकीच्या मनसेकडून चाचपणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत काल कल्याण मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतत त्यांनी राजकीय परिस्थितीवर सडेतोड टीका केली. मराठा आरक्षण, निवडणूक आयोग, राष्ट्रवाद आमदार अपात्रता सुनावणीवरही भाष्य केलं.

यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरणात रायगडावर करण्यात आले यावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातले महापुरुष जाती मध्ये विभागून टाकलेत , आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावरून भाष्य केलंय. महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. विधानभवनात एका कार्यक्रमाला गेलो असताना,कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नसल्याचं राज ठाकरे म्हणालेत. एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नव्हतं.अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नव्हतं. लोकांनी यांना वठणीवर आणले पाहिजे. जोपर्यंत लोक यांना वठणीवर आणत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर करतोय असेच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार असल्याची टीका त्यांनी केलीय.

अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात मात्र त्यांच्या समोरच राजकारण सुरू आहे ते पाहून तरुण वर्ग राजकारण येणार नाही. या गोष्टीचा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे, अन्यथा महाराष्ट्राच काही खरं नाही असे सांगितले. राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाबाबत बोलतांना राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील तर हे वाद कोणीतरी घडवतोय असाही आरोप त्यांनी केला.

महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न असून दुष्काळी स्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण पुढं केलं जात असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का घेतलं? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे असेही ते म्हणाले.

मराठी भाषेला अभिषेक दर्जा मिळण्याबाबतचे मागणे अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही. तर राज्यात राज्यातले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत,तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असेही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Raj Thackeray News: पाच वर्ष झोपा काढल्या का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले; प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com